Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

KKHH : जावेद अख्तर यांनी शाहरुखच्या चित्रपटाची गाणी लिहण्यास का दिला होता नकार?
“प्यार दोस्ती है…” किंवा “कुछ कुछ होता है राहूल तुम नहीं समझोगे…”, आज जरी हे डायलॉग जरा आऊटडेटेड किंवा चिझी वाटले तरी एक काळ होता जेव्हा प्रत्येक तरुणांच्या ओठांवर या चित्रपटाचे डायलॉग्ज होते. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai) या चित्रपटाची यंग जनरेशनमध्ये चांगलीच लोकप्रियता होती. चित्रपटातील राहूलचा (Shah rukh khan) रोमॅंटिक अंदाज असो किंवा राहूल-टीना(Rani Mukherjee)-अंजलीचा (kajol) लव्ह ट्रायअॅंगलअसो. चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण होऊनही हा चित्रपट आजही रिलेट करु शकतो. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग जितका गाजला तितकीच प्रत्येक गाणीही गाजली. पण तुम्हाला माहित आहे का? या चित्रपटाची गाणी जावेद अख्तर यांनी लिहावी अशी दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याची इच्छा होती पण त्यांनी गाणी लिहण्यास साफ नकार दिला होता. काय होतं कारण वाचा…
गीतकार जावेद अख्तर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील गाणी लिहण्यास नकार दिला होता याची कबूली दिली. त्यांना चित्रपटाचं शीर्षक ‘वल्गर’ वाटल्यामुळे त्यांनी नकार दिल्याचंही त्यांनी म्हटलं. जावेद यांनी नकार दिल्यानंतर समीर अंजान यांनी चित्रपटाची गाणी लिहीली होती. आणि ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कुछ कुछ होता है चित्रपटाबद्दलकाही खुलासे केले. (Entertainment news)

समीर म्हणाले की, “जावेद अख्तर (Javed Akhtar) खरं तर या चित्रपटासाठी गाणी लिहिणार होते. पण चित्रपटाचं नाव त्यांना योग्य न वाटल्यामुळे त्यांनी माघार गेली. त्यांनी दिग्दर्शक करण जोहरला चित्रपटाचं नाव देखील बदलण्याचा सल्ला दिला होता. पण तसं काही घडलं नाही. आणि मग मी चित्रपटासाठी गाणी लिहिली; मी ज्यावेळी गाणी लिहित होतो तेव्हा मी यंग असल्यामुळे प्रेम, त्या भावना मी समजू शकत होतो आणि त्यामुळे मला कुठेही चित्रपटाचं नाव चुकीचं वाटलं नाही”, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. (Kuch Kuch Hota Hai movie)
==============
हे देखील वाचा : शाहरुख खानला हिंदी सिनेमात पहिला ब्रेक हेमामालिनीने दिला!
==============
हे झालं ‘कुछ कुछ होता है’ मधील गाण्यांबद्दल; आणखी महत्वाची बाब म्हणजे चित्रपटाची सुरुवात पुर्णपणे बदलण्यात आली होती. दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, “कुछ कुछ होता है चित्रपटाच्या सुरुवातीला राणी मुखर्जीचं (Rani Mukherjee) डोहाळ जेवण दाखवणार होतो. खरंतर करण यांना बाळाला जन्म दिल्यानंतर मी जगणार नाहीये हे सत्य टीनाला माहित आहे आणि त्याचं दु:ख तिच्या डोळ्यांमध्ये दिग्दर्शकाला दाखवायचं होतं. पण आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांना ही सुरुवात आवडली नाही आणि तो प्लॉट कॅन्सल करण्यात आला”.

‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hoya Hai) चित्रपटात टीना-राहूल या जोडीपेक्षा अंजली-राहूल हीच जोडी प्रेक्षकांना अधिक भावली. तुम्हाला आठवतं का बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा कॅम्पला राहूल आणि अंजलीची भेट होते तेव्हा राहूल फक्त साडी इतकंच वाक्य बोलतो. खरं तर त्या सीक्वेन्समध्ये भला मोठा डायलॉग होता; पण तो शाहरुख आणि काजोल दोघांनीही पाठ न होत असल्यामुळे काढून टाकण्यात आला होता. (Bollywood nostalgia movies)
प्रेम आणि मैत्री या दोन्ही नात्यांचं परफेक्ट व्हिजूव्हलायझेशन चित्रपटाच्या रुपात मांडणारा ‘’कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hoya Hai) हे परफेक्ट उदाहरण आहे. करण जोहर यांचं पहिलं दिग्दर्शन असणारा ‘’कुछ कुछ होता है’ चित्रपट सलमान खान (Salman khan) याने देखील केवळ करणच्या एका शब्दामुळे साईन केला होता. १९९८ साली आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देशात ४६ कोटी आणि जगभरात ९१ कोटी कमावले होते. (Box office collection)