Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि पारंपारिक उपाय!
Jaya Bachchan: सौंदर्यप्रसाधनांचा झगमगाट असलेल्या बॉलिवूडमध्येही आता अनेक सेलिब्रिटी महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपायांवर भर देत आहेत. याच अनुषंगाने जया बच्चन यांनी नुकताच एक खास स्किनकेअर नुस्खा शेअर केला जो त्यांना त्यांच्या नानीकडून मिळाला होता. हा उपाय त्यांनी त्यांच्या नाती नव्या नवेली नंदा च्या पॉडकास्ट ‘What The Hell Navya’ मध्ये उघड केला.जया बच्चन यांनी सांगितले की त्यांची नानी केमिकल्स शिवाय नैसर्गिक स्क्रब तयार करत असत, जो त्वचेवरील मळ, टॅनिंग आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी होता. हा स्क्रब त्वचेला केवळ स्वच्छ करत नाही, तर तिचा नैसर्गिक चमकही परत आणतो.(Jaya Bachchan Glowing Skin Secret)

स्क्रबसाठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ २-३ चमचे, ताजी दूधाची साय (मलाई) १-२ चमचे आणि हळद एक चिमूटभर हे आहे. हे बनवण्याची एका छोट्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मलाई आणि हळद एकत्र करून एक गाढसर पेस्ट तयार करा. पेस्ट खूप घट्ट वाटल्यास थोडे गुलाबजल किंवा पाणी घालून मऊसर बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर, मानेवर किंवा टॅनिंग झालेल्या भागावर लावा. सौम्य हातांनी गोलाकार मसाज करत स्क्रब करा (२-३ मिनिटे). नंतर ५-१० मिनिटे पेस्ट तसेच ठेवून द्या. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

आठवड्यातून २-३ वेळा हा स्क्रब वापरल्यास त्वचेत लक्षणीय फरक दिसून येतो.गव्हाचे पीठ त्वचेवरील मृत पेशी (dead skin) काढून टाकते. मलाई त्वचेला पोषण देऊन मऊ आणि नितळ बनवते. हळद त्वचेला संक्रमणापासून सुरक्षित ठेवते आणि नैसर्गिक तेज वाढवते.(Jaya Bachchan Glowing Skin Secret)
================================
================================
जया बच्चन यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्या रासायनिक प्रॉडक्ट्स ऐवजी पारंपरिक उपायांवर विश्वास ठेवतात. त्यांच्या मते, हे उपाय शतकानुशतके वापरले गेले आहेत आणि त्यांना कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. गर्मीत त्वचा उन्हामुळे सहज काळसर दिसू लागते आणि मळ साचल्यास ती निस्तेज होते. अशा वेळी जया बच्चन यांच्या नानीचा हा पारंपरिक स्क्रब त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि नितळपणा टिकवण्यासाठी उत्तम उपाय आहे. हा नुस्खा वापरण्याआधी त्वचेला टेस्ट करून पाहा, विशेषतः संवेदनशील त्वचा असल्यास. नैसर्गिक असला तरी प्रत्येकाची त्वचा वेगळी असते.