हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सौंदर्य, अभिनय आणि बोलक्या डोळ्यांनी राज्य करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी जयश्री गडकर (Jayashree Gadkar) यांची आज पुण्यतिथी… मराठीतील सुपरस्टार अशी ओळख मिळवणाऱ्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती… त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका गृहिणींना आपल्याशा वाटत होत्या… पण तुम्हाला माहित हे का जयश्री गडकर यांना पहिला ब्रेक नेमकी कसा आणि कुणामुळे मिळाला? जाणून घेऊयात…

तर, जयश्री गडकर यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती…जयश्री ५ वर्षांच्या असताना त्या मुंबईत आल्या… इथे त्यांनी कथक नृत्याचं आणि गायन कलेचं शिक्षण घेतलं.. जयश्री यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. त्याकाळी एक फोटोग्राफर होते राम देवताळे त्यांनी एका समारंभात नृत्य करणाऱ्या जयश्री यांचा फोटो काढला आणि स्वत:च्या स्टुडिओत लावला. राम यांच्या स्टुडिओतील तो फोटो दिनकर पाटील यांनी पाहिला आणि त्यांच्या ‘दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात नृत्य करण्याची संधी दिली. पुढे व्हि शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात त्यांनी नृत्य केलं… यानंतर जयश्री यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : ऐश्वर्या रायची प्रेग्ननसी आणि Madhur Bhandarkar यांचं डिप्रेशन; काय आहे कनेक्शन?
=================================
जयश्री गडकर यांनी ‘आलिया भोगासी’, ‘सांगत्ये ऐका’, ‘जय भवानी’, ‘बाप माझा ब्रम्हचारी’, ‘सुख आले माझ्या दारी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘सुभद्रा हरण’, ‘साधी माणसं’, ‘जिव्हाळा’ अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केलं… तसेच, रामानंद दयासागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील जयश्री यांनी साकारलेली कौशल्या माता आजही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे… याशिवाय ‘बिंद्या’, ‘ससुराल’, ‘ये दिल किसको दु’, ‘मेरे अरमान मेरे सपने’, ‘लव-कुश’, ‘हर हर गंगे’, ‘दावत’, ‘संपूर्ण महाभारत’ अशा बऱ्याच कौटुंबिक आणि पौराणिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत…

जयश्री गडकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन क्षेत्रातही आपलं नाव कमावलं होतं… ‘सासर माहेर’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं… इतकंच नाही तर ‘अशी असावी सासू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत निर्मिती, लेखन अशा तिहेरी जबाबदाऱ्या त्यांनी लीलया सांभाळल्या होत्या…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi