Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Munnabhai MBBS मधला ‘तो’ सीन ‘3 Idiots’ मध्ये कसा आला?

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar;

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jhimma 2 Movie: नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीस! 

 Jhimma 2 Movie: नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीस! 
kalakruti-jhimma-2-movie-marathi-pori-song-from-jhimma-2-which-preserves-the-new-womanhood-of-a-new-look-marathi-info/
मिक्स मसाला

Jhimma 2 Movie: नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीस! 

by Team KalakrutiMedia 06/11/2023

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ ने यापूर्वीच आपल्या टिझरच्या माध्यमातून सर्वत्र ‘झिम्मा’ मय वातावरण निर्माण केले आहे. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी ‘झिम्मा’च्या गाण्यांनी संगीतप्रेमींना भुरळ घातली होतीच, त्यामुळे आता झिम्मा २ मधील संगीताकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. खरंतर ‘मराठी पोरी’ या दोन शब्दांमध्येच या गाण्याचा भावार्थ कळतो. 

Jhimma 2 Movie
Jhimma 2 Movie

‘इंदू’च्या ७५व्या वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन असून यात प्रत्येकीचा जबरदस्त स्वॅग दिसत आहे. ‘मराठी पोरी’ हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एकंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत या गाण्यातून सांगितली आहे. तसेच कलाकारांच्या वेशभूषेने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. ‘मराठी पोरी’ हे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच ते डोळ्यांनाही सुखावणारे आहे. अतिशय एनर्जीने भरलेले हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. गाण्याबद्दल संगीतकार अमितराज म्हणतात, ”प्रत्येकीची खासियत सांगणारे हे गाणे आहे. मुळात हे सेलिब्रेशनचे गाणे असल्याने तशा मूडचे संगीत असणे फार आवश्यक होते आणि त्या मूडला साजेसे असेच संगीत आम्ही दिले आहे.

Jhimma 2 Movie
Jhimma 2 Movie

यातील कलाकारच इतके भन्नाट आहेत की, संगीतही त्या गाण्याला तितक्याच ताकदीचे हवे होते. क्षितिजच्या गाण्याचे बोलही खूप सुरेख आहेत. ज्यातून प्रत्येकीची ओळख होत आहे. मुळात या सात जणी म्हणजे इंद्रधनूतील सात रंग आहेत आणि हे सात रंग एकरूप झाल्याचा फील या गाण्यातून येतोय. मला खात्री आहे, हे गाणे करताना आम्हीही खूप एन्जॉय केले आहे. त्यामुळे प्रेक्षकही हे गाणे मनापासून एन्जॉय करतील.” तर गायक आदर्श शिंदे म्हणतात, ”आमचे पायही हे गाणे गाताना आपसूक थिरकत होते.

====================

हे देखील वाचा: Naal 2 Trailer: ‘नाळ भाग २’ चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

====================

प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे,  उत्साह आणि आनंदाने भरलेले आहे. या गाण्याचे चित्रीकरणही कमाल झाले आहे. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शीत होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment jhimma 2 jhimma marathi movie kshiti jog marathi movie 2023 rinku rajguru sayali sanjeev siddharth chandekar Suhas Joshi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.