
Jolly LLB 3 : अर्शद-अक्षयचा कोर्ट ड्रामा, जॉली एलएलबी ३’ची रिलीज डेट जाहिर
प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर, कोर्ट रूम ड्रामा असे चित्रपट फार आवडीने पाहायला आवडतात. आणि याच पठडीतील ‘जॉली एल.एल.बी’ (Jolly LLB) हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता ज्यात अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि बोमन इराणी (Boman Irani) प्रमुख भूमिकेत होते. आता ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) लवकरच भेटीला येणार असून यात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी एकत्र असणार आहेत. अशातच आता बहुप्रतिक्षित कोर्टरुम ड्रामा ‘जॉली एलएलबी ३’ (Jolly LLB 3) ची रिलीज डेट जाहीर झाली असून पहिल्या दोन यशस्वी भागांनंतर आता दोघंही कोर्टरुममध्ये एकमेकांसमोर येणार आहेत.

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहेच. आधीचे दोन्ही पार्ट बॉक्सऑफिसवरही तुफान गाजले होते. त्यामुळे तिसऱ्या पार्टीचे प्रेक्षक फार अपेक्षेने पाहाच आहेत. मेकर्सने जॉली एल.एल.बी ३ ची रिलीज डेट जाहिर केली असून चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार १९ सप्टेंबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुभाष कपूर यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार जॉली मिश्रा आणि अर्शद वारसी जॉली त्यागीच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Jolly LLB 3 release date)
============
हे देखील वाचा : Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
============
२०१३ नंतर २०१७ साली ‘जॉली एल.एल.बी २’ (Jolly LLB 2) आला होता ज्यात अक्षय कुमारने वकिलाची भूमिका साकारली होती. आता तब्बल ८ वर्षांनी ‘जॉली एल.एल.बी ३’ प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांना आता कोर्ट रुममध्ये नवा ड्रामा काय होणार याची आतुरता लागली आहे. अक्षय आणि अर्शदचं कॉमिक टायमिंग पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडणार हे नक्की. (Bollywood update)