Bollywood Movies : ३४ वर्षांच्या कारकिर्दित या अभिनेत्याने फ्लॉपपेक्षा सुपरहिट

Jr. NTR : जपानी फॅन RRR पाहून शिकली तेलुगू भाषा!
तेलुगू सुपरस्टार ज्युनिअर एन.टी.आर (Jr.NTR) चे चाहते केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीसह परदेशातही आहेत. एन.टी.आरच्या आर.आर.आर (RRR) चित्रपटाने तर जपानमध्ये धुमाकूळ घातला होता. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘देवारा – पार्ट १’ (Devara – Part 1) हा चित्रपटआला होता ज्यात त्याच्यासोबत जान्हवी कपूर आणि श्रुती मराठे दिसल्या होत्या. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या तो जपानमध्ये फिरत आहे. जपानमधील प्रेक्षकांनी एन.टी.आरच्या देवारा चित्रपटाचा उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याच्या भावना व्यक्त करत जपानमध्ये भारतीय चित्रपटांचं यश एन.टी.आर साजरा करताना दिसला.(Tollywood movies)
एन.टी.आरने (Jr.NTR) त्याच्या या जपान टूरची माहिती देत सशल मिडीयावर तेथील प्रेक्षकांशी तितकी आत्मियतेने त्याचं स्वागत केलं त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. या सोबत त्याने लिहिले आहे की, “प्रत्येकवेळी मी जेव्हा जपानला जातो तेव्हा नव्या आठवणी मी घेऊन येतो. पण यंदाचा जपान ट्रिप फार खास होती. कारण, तेथील एका जपानी फॅनने आर.आर.आर चित्रपट पाहिल्यानंतर तेलुगू भाषा शिकली होती आणि ते ऐकून मला फारच आनंद झाला”. (Telugu films)

पुढे तो लिहितो, “मी एक चित्रपटाचा चाहता असल्यामुळे, चित्रपटाची ताकद एका सातासमुद्रापार असणाऱ्या चाहत्यांचा एक नवी भाषा शिकण्याची प्रेरणा देतो हे फारच खास आणि अभिमानास्पद आहे. आणि हेच आपल्या भारतीय चित्रपटांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर यश आहे”. (Indian films)

राजामौली दिग्दर्शित ‘आर.आर.आर’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित केला होता. तिथे या चित्रपटाला मिळालेला उत्तुंग प्रतिसाद प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानास्पद होता. दरम्यान, लवकरच. एन.टी.आर NTRNeel या चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन केजीएफ फेम प्रशांत नील करणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगसाठी २००० ज्युनियर आर्टिस्टसोबत लवकरच हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये शुटींग सुरु करणार आहेत. (Entertainment news update)
============
हे देखील वाचा : Deepika Padukone : “Oscars मध्ये भारतीय चित्रपटांना वगळण्याची ही पहिली वेळ नाही”
============