Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग

Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा

‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर;

Sushmita Sen वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने स्वतः

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna

Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’!

 पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’!
Jyotsna Bhole Swarotsav
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’!

by रसिका शिंदे-पॉल 13/06/2024

मराठी संगीत रंगभूमी ही मराठी मनाच्या मर्मबंधातील ठेव… मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थी रुजवण्यात अनेकांनी मोलाचे प्रयत्न केले. आवाजावरची हुकमत, रंगतदार आलापी, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ साधत स्व. गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभेचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच संगीतातील योगदानासाठीही ओळखल्या जाणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांनी अवघ्या १३ व्या वर्षी शास्त्रीय गायिका म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. आपल्या स्वर्गीय सुरावटींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी, पुणे यांच्या वतीने ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’ आयोजित करण्यात येतो. यंदाही २० व २१ जून अशा दोन दिवसीय ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे १४ वं वर्ष आहे. (Jyotsna Bhole Swarotsav)

Jyotsna Bhole Swarotsav
Jyotsna Bhole Swarotsav

टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सायं.४ ते ८ या वेळेत हा स्वरमहोत्सव रंगणार आहे. गुरुवार २० जूनला सुरवातीला महोत्सवाच्या प्रास्ताविके नंतर शिल्पा पुणतांबेकर, भाग्येश मराठे, सिनेअभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकर यांची नाट्यसंगीत मैफल सायं. ५ वा. होणार असून, त्यांना प्रशांत पांडव, उदय कुलकर्णी, केदार परांजपे, माऊली टाकळकर साथ करणार आहेत. शुक्रवारी २१ जूनला सायं. ५ वा. पं. संजीव अभ्यंकर, रुचिरा केदार, शाकिर खान यांची शास्त्रीय संगीताची मैफल होईल. त्यांना रोहित मुजुमदार, माधव लिमये, पांडुरंग पवार, अजिंक्य जोशी, अभिनय रवंदे  साथ करणार आहेत. मिलिंद कुलकर्णी निवेदन करणार आहेत.(Jyotsna Bhole Swarotsav)

============================

हे देखील वाचा: ‘सुरुवात गोड तर सगळंच गोड’ म्हणत शिवानीकडून  सुबोधसाठी खास गिफ्ट …

============================

या महोत्सवाचे संयोजक अधिश प्रकाश पायगुडे यांनी सांगितले की, ”संगीत रंगभूमी हे मराठी रंगभूमीचे वैभव असून त्याचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे या उद्देशाने माझे वडील प्रकाश पायगुडे,  पं. शौनक अभिषेकी व ज्योत्स्नाबाईंची कन्या वंदना खांडेकर यांनी या महोत्सवाची सुरुवात केली.वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर हा वारसा मी पुढे चालू ठेवला आहे.” या वर्षीपासून या कार्यक्रमात कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार देणार आहोत. यंदा  हा सन्मान ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शैला दातार यांना मिळणार आहे. हा महोत्सव विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी या ‘स्वरोत्सवा’चा आस्वाद घ्यावा असे आवाहन सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष अधिश पायगुडे यांनी केले आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Jyotsna Bhole Jyotsna Bhole Swarotsav Srujan foundation
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.