
Kajol : सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट खरंच नाकारला होता का?
बालपणापासूनच अभिनयाचं बाळकडू आई तनुजा (Tanuja) यांच्याकडून मिळाल्यामुळे अभिनेत्री काजोल (Kajol) हिच्या नावावर अनेक आयकॉनिक आणि हिट चित्रपटांची नोंद आहे… मुळात आजच्या भाषेतील नेपॉकिड असूनही काजोलने कधीच त्याचा फायदा घेतल्याचं दिसलं नाही…बेखुदी ते दो पत्ती असा अभिनयाचा वर्सटाईल प्रवास करणाऱ्या काजोलने सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर : एक प्रेम कथा’ चित्रपट आणि त्यातील साकिनाची भूमिका नाकारल्याचं सांगितलं गेलं होतं…पण हे कितपत खरं आहे याबद्दल जाणून घेऊयात..(Gadar : Ek Prem Katha)

अभिनेत्री काजोल (Kajol) हिला २००१ मधील सुपरहिट चित्रपट ‘गदर’ (Gadar movie) ऑफर करण्यात आला होता. पण याबद्दल बोलताना एका मुलाखतीमध्ये काजोलने हे विधान टाळलं आहे.. न्यूज १८च्या भारत समिट २०२५ मध्ये बोलताना काजोल म्हणाली की, “मला कधीच गदर चित्रपटाची किंवा त्यातील साकिना या भूमिकेची ऑफर दिली गेली नव्हती”. दरम्यान, २००१ मध्ये ‘गदर’ चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले होते… ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरत या चित्रपटाने ७६.८८ कोटी कमवत ‘हम आपके है कौन?’ (Hum Aapke Hain Kaun?) चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला होता…(Gadar movie box office collection)

काजोलनले (Kajol) या मुलाखतीमध्ये ‘गदर’ व्यतिरिक्त इतर काही चित्रपट ऑफर झाल्याचं सांगितलं आणि त्यांना तिने वेगवेगळ्या कारणांमुळे नकार दिल्याचंही स्पष्ट केलं… यावेळी ठराविक चित्रपटाचं नाव न घेता काजोल म्हणाली की तिने रिजेक्ट केलेले काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप झाले…(Entertainment trending news)
===============================
हे देखील वाचा: Devika Rani : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका!
===============================
काजोल हिची आईच नव्हे तर आजी देखील कलाक्षेत्रात कार्यरत होती… “मला इंडस्ट्रीत कुणाच्याशी शिफारशीने कधीच काम किंवा चित्रपट नको होता… मला स्वत:शी आणि माझ्या कामाशी प्रामाणिक राहायचं होतं.. आणि त्यामुळेच माझं आडनाव न वापरता केवळ काजोल अशी इंडस्ट्रीत माझी ओळख व्हावी हा माझा वैयक्तिक निर्णय होता…” (Bollywood industry)

दरम्यान, काजोलने ‘दिल तो पागल है’ ( Dil To Pagal Hai) चित्रपटातील करिश्माने साकारलेली भूमिका नाकारली होती… याशिवाय, मनी रत्म यांचा ‘दिल से’, ‘मोहरा’, ‘वीर झारा’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘३ इडियट्स’ (3 Idiots) हे चित्रपट नाकारले होते..(Kajol rejected movies)
काजोलने वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.. १९९२ मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटापासून तिचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत सुरुच आहे… पहिला चित्रपट काजोलचा फारसा चालला नाही पण त्यानंतर १९९५ मध्ये ‘करण-अर्जून’ (Karan-Arjun) आणि ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhaniya Le Jayenge) हे दोन्ही चित्रपट बॅक टू बॅक हिट देत काजोलने नवी सुरुवात केली.. त्यानंतर ‘गुप्त’ चित्रपटात पहिल्यांदाच खलनायिका साकारल्यानंतर या भूमिकेसाठी फिल्म फेअर पुरस्कार पटकावणारी ती पहिली अभिनेत्री ठरली…(Filmfare Awards)
===============================
हे देखील वाचा: Bollywood Movies 2025 : केवळ २ चित्रपटांनी रिकव्हर केली बजेटची रक्कम!
===============================
याशिवाय आत्तापर्यंत काजोलने ‘बाजीगर’, ‘हलचल’, ‘इश्क’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘राजू चाचा’, ‘दिल क्या करे’, ‘फना’, ‘माय नेम इज खान’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… लवकरच काजोल विशाल फुरिया दिग्दर्शित ‘मां’ चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे… (Bollywood update)