
Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला सांगितलं कारण…
वयाची चाळीशी गाठलेल्या अभिनेत्यांनी ‘३ इडियट्स’ (3 Idiots Movie) चित्रपटात कॉलेज स्टुडंट्सची साकारली भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे… राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ या चित्रपटाने हिंदीत एक इतिहास रचला होता… आमिर खान (Aamir Khan), आर माधवन (R Madhvan), शरमन जोशी आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांची प्रमुथ भूमिका असणाऱ्या या चित्रपटात आधी करिना ऐवजी काजोलची (Kajol) वर्णी लागली होती… मात्र तिने हा चित्रपट नाकारला होता.. आता जवळपास १६ वर्षांनी काजोलने चित्रपटाला का नकार दिला होता त्याचं कारण सांगितलं आहे.(Bollywood news)

९०च्या दशकापासून ‘बाजिगर’, ‘करण अर्जून’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ किंवा ‘इश्क’ अशा बऱ्याच चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणारी काजोल लवकरच ‘माँ’ या चित्रपटातून भेटीला येणार आहे… या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला ‘३ इडियट्स’ (3 Idiots Movie) चित्रपटाबद्दल विचारला असता नकाराचं कारण तिने सांगितलं आहे. काजोलने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, हा चित्रपट नाकारल्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. असं म्हटलं जातं, तुम्ही ज्यासाठी पात्र आहात ते तुम्हाला मिळतंच. त्यामुळे मला वाटतं की, मी त्या चित्रपटांशिवाय आणखीही खूप चांगलं काम केलं आहे.”(Bollywood Tadaka)

दरम्यान, हिरानी यांनी काजोल हिला प्रियाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. आणि नंतर ती भूमिका करिना कपूर हिने साकारली होती. पुढे याबद्दल अधिक बोलताना ती म्हणाली की, “जर मला पटकथा आवडत नसेल, तर मी कोणत्याही प्रोजेक्टला नकार देताना जास्त विचार करत नाही”.(3 Idiots Movie)
================================
हे देखील वाचा: ‘या’ कारणामुळे काजोलने नाकारला चक्क मणीरत्नमचा चित्रपट!
=================================
काजोलच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ‘शैतान’ (Shaitaan Movie) चित्रपटाच्या फ्रेंचायझीमधला हा चित्रपट आहे. २७ जून रोजी प्रदर्शित होणारा एक थ्रिलर चित्रपट असून हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे.(Upcoming bollywood movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi