Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Ajay Devgan: आधी नेटकरी आणि आता काजोलने सुद्धा केलं अजयला ट्रोल
सध्या कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एकच गाणं व हुकस्टेप आपल्याला दिसतेय, म्हणजे अजय देवगण (Ajay Devgan) व मृणाल ठाकूरचं (Mrunal Thakur) ‘पेहला तु दुजा तू…’! खरंतर या आधीही अजयची अशी अनेक गाणी आली होती ज्याच्या हुकस्टेप्स व्हायरल झाल्या होत्या. मात्रं, पहिल्यांदाच या गाण्याच्या स्टेप्सवर अजयने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर, त्याची बायको व अभिनेत्री काजोल हिने देखील यावर रिएक्शन दिलीये. (Bollywood News)

अजय देवगण व मृणाल ठाकूर यांच्या ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2 Movie) चित्रपटातील ‘पेहला तू दुजा तू, तिजा तू चौथा तू’ या गाण्यांच्या ओळींवर अजय व मृणाल हाताच्या बोटांनी हुक स्टेप करताना दिसतायत. यावर प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल केलंच पण, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत काजोल म्हणाली, “मला असं वाटतं, अजय इंडस्ट्रीतील सर्वोत्तम डान्सर आहे, कारण तो एकमेव असा व्यक्ती आहे जो त्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून नाचू शकतो. आधी असं होतं की तो चालत यायचा आणि त्यानुसार म्युझिक असायचं, आता तर तो नाचताना फक्त बोटांचा वापर करत आहे. मला असं वाटतं, तो आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात हुशार डान्सर आहे.” आता काजोलनेच (Kajol) नकळत अजयला ट्रोल केलंय असं काहीसं चित्र दिसतंय. तर, ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला अजय देवगणने स्वत:ही रिएक्शन दिली होती. तो म्हणाला, “तुम्ही लोकं माझी मस्करी करता , पण माझ्यासाठी हे एवढं करणंसुद्धा खूप कठीण होतं; तरी ते मी केलं त्यासाठी तुम्ही आभारी असायला हवं.”
================================
=================================
सध्याचा बॉलिवूडचा आढावा घ्यायचं झालं तर अजय-काजोल हे इंडस्ट्रीतलं गाजणारं Power Couple नक्कीच ठरलं आहे. ‘तानाजी’च्या यशानंतर जरी काजोल-अजय एकत्र दिसले नसतील तरी Individually दोघेही बॉलिवूड गाजवतायत. लवकरच काजोल ‘Maharagni: Queen Of Queens या ॲक्शन सिनेमात दिसणार आहे. तर अजय देवगण ‘दे दे प्यार दे २’ व ‘गोलमाल ५’ व ‘दृश्यम ३’ मध्ये झळकणार आहे. त्यामुळे आगामी काही वर्ष अजय-काजोलचीच असणार हे मात्रं नक्की.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi