
Kantara : A Legend Chapter 1 चित्रपट ग्लोबली हिट होण्यासाठी मेकर्सने उचललं ‘हे’ महत्वाचं पाऊल!
ग्लोबली कन्नडा चित्रपटसृष्टीचं नाव मोठं करण्यात बऱ्याच कलाकारांचा हातभार आहे खरा; पण आवर्जून दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) याचं नाव घ्यायला हवं… २०२२ मध्ये आलेल्या त्याच्या ‘कांतारा’ (Kantara Movie) या कन्नड चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावलं…. आणि आता या चित्रपटाचा सीक्वेल ‘कांतारा : अ लेजंड चॅप्टर १’ (Kantara Chapter 1) लवकरच रिलीज होणार असून चित्रपटात अभिनयासोबतच ऋषभ शेट्टी दिग्दर्शनही करणार आहे…(Kannada Films) दरम्यान, प्रेक्षकांचा ‘कांतारा’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता मेकर्सनी कांतारा चॅप्टर १ बद्दल मोठा निर्णय घेतला आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ शेट्टी आणि होम्बले फिल्म्स यांनी जागतिक पातळीवरील प्रेक्षकांपर्यंत कांतारा पर्यायाने कन्नड चित्रपट पोहोचावा यासाठी कांतारा चॅप्टर १ स्पॅनिश भाषेत डब करण्याचा निर्णय घेतला आहे… अभिमानाची बाब म्हणजे स्पॅनिश भाषेत रिलीज होणारा हा पहिला कन्नड चित्रपट ठरणार आहे… ‘कांतारा’ चित्रपट हा कन्नड चित्रपटसृष्टीसाठी फार महत्वाचा असून याच चित्रपटासाठी पहिल्यांदा ऋषभ शेट्टीला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता… लोककथेवर आधारित कांताराचं कथानक जगभरातील लोकांपर्यंत पोहोचावं हाच उद्देश मेकर्सचा आहे… (Kantara Movie dubbed in Spanish)
================================
हे देखील वाचा : Bobby Deol ‘या’ अभिनेत्रीच्या होता प्रेमात; ५ वर्षांचं रिलेशनशिप, लग्नही ठरलेलं पण…
=================================
दरम्यान, ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट देशभरात २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… त्यासोबतच या दिवशी वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे.. आता प्रेक्षक दोन्ही चित्रपटांना कसा प्रतिसाद देतात हे पाहायला हवं…. (Upcoming movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi