‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         Kantara : The Legend-Chapter 1 मधील ‘तो’ म्हातारा कोण होता?
ऋषभ शेट्टी याने ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाची फ्रेंचायझी जगभरात वन मॅन शो करत गाजवली… लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय या तिन्ही जबाबदाऱ्या त्याने लिलया सांभाळल्या.. पण तुम्हाला माहित आहे का ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ मध्ये ऋषभ दुहेरी भूमिकेत दिला आहे… कोणता आहे ती भूमिका? जाणून घेऊयात…
तर, ऋषभ शेट्टीने ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटात एक नाही तर दोन पात्रे साकारली होती. आता एका बीटीएस व्हिडिओद्वारे आता हे उघड झालं असून चित्रपटातील गूढ असणारं पात्र मायकारा (Mayakara) ऋषभ शेट्टीने साकारलं आहे… सोशल मिडियावर तो मायकारा या भूमिकेसाठी तयार होत असतानाचा BTS व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अखेर मायकारा कोण या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळालं आहे…

खरं तर, ‘कांतारा १’ हा संपूर्ण चित्रपटच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत त्यांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे… सुरुवातीपासूनच मायकारा हे पात्र नेमकी कोण आहे आणि तो फक्त बेरमेलाच का दिसतं या प्रस्नाचं उत्तर तरी संपूर्ण चित्रपटात मिळालं नसलं तरी ही भूमिका ऋषभनेच साकारली आहे हे मात्र समोर आलं आहे… होम्बले फिल्म्सने यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टीचे ‘मायकारा’मध्ये रूपांतर होताना दिसते… या व्हिडिओतून एक गोष्ट ही समोर आली ती म्हणजे ऋषभला मायकारा होण्यासाठी तब्बल ६ तास मेकअपसाठी लागत होते.. त्यामुळे सोशळ मिडियावर आता ऋषभचं अधिकच कौतुक केलं जात आहे…
================================
हे देखील वाचा : Rukmini Vasanth : ‘कांतारा – चॅप्टर १’ मधली ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण?
================================
दरम्यान, ‘कांतारा १’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने भारतात केवळ दोन दिवसांत १०० कोटी रुपये कमावले होते… तसेच, आत्तापर्यंत देशात ७०० आणि जगभरात ८०० कोटींचा टप्पा पार करत कांतारा १ ने विकी कौशलच्या ‘छावा’ला मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
