
Kapoor Family : कपूर कुटुंबाच्या निळ्या डोळ्यांचं रहस्य काय आहे?
हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की कपूर कुटुंबाचं नाव सर्वात आधी घ्यायलाच हवं. बॉलिवूडमधील सर्वात मोठं स्क्रिन कुटुंब असणाऱ्या कपूर फॅमिलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. कपूर कुटुंबातील १५ पेक्षा अधिक सदस्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं करिअर घ़डवलं आहे. केवळ अभिनयच नाही तर कपूर कुटुंबाचं ग्लॅमर, सौंदर्य आणि त्यांच्या निळ्या डोळ्यांसाठी त्यांची सर्वाधिक चर्चा आहे. १९२९ साली पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांनी अभिनयाची सुरुवात करत हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचा पाया रोवला. त्यानंतर राज कपूर (Raj Kapoor) पासून ते अलीकडे रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor) सगळ्यांनी तो जपला आहे. अभिनयासोबतच कपूर कुटुंबाला निळ्या डोळ्यांचा वारसाही मिळाला. जाणून घेऊयात कपूर कुटुंबातील सदस्यांच्या निळ्या डोळ्यांचं रहस्य… (kapoor family)

तर, पृथ्वीराज कपूर आणि त्यांचे भाऊ त्रिलोक कपूर यांनी एकत्र हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. पृथ्वीराज यांना राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर अशी तीन मुलं. या तिघांनीही अभिनय क्षेत्रात आपलं विश्व तयार केलं. राज कपूर तर हिंदी चित्रपटांचे ‘शो मॅन’ ठरले. राज कपूर यांच्या Randhir Kapoor आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) या मुलांनी यश मिळवून उत्तम चित्रपट दिले. रणधीर कपूर यांच्या दोन्ही मुली करिश्मा आणि करिना उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. करिश्मा हिचे डोळे तिच्या आजोबांवर म्हणजे राज कपूर यांच्यासारखे आहेत. पण कपूर कुटुंबाला निळ्या डोळ्यांचा वारसा लाभला आहे पृथ्वीराज कपूर यांच्या पत्नीकडून. (Karishma and Kareena Kapoor)
===========================
हे देखील वाचा: Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’
===========================
पृथ्वीराज कपूर यांनी रामसरणी मेहता यांच्याशी १९२३ मध्ये लग्न केलं. आणि या रामसरणी यांच्या डोळे निळे होते आणि त्यामुळेच कपूर कुटुंबाला निळ्या डोळ्यांचा वारसा लाभला. पृथ्वीराज यांना राज, शम्मी, शशी, उर्मिला साई, नंदी आणि देवी कपूर अशी ६ मुलं झाली आणि त्यांच्यापैकी केवळ राज कपूर यांचे डोळे आपल्या आईसारखे निळेशार होते. त्यांच्या या निळ्या डोळ्यांची लेगसी पुढे अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सुरु ठेवली. पण तुम्हाला माहित आहे का राज कपूर यांनी नात करिश्मा जेव्हा जन्माला आली त्यावेळी तिला पाहण्यासाठी एक अट ठेवली होती.(Bollywood untold stories)

१९७४ मध्ये बबिता आणि रणधीर यांना कन्यारत्न झालं तिचे म्हणजे करिश्मा. तिच्या जन्माची खास आठवण आई बबिता यांनी शेअर केली होती. त्या म्हणाल्या की, “करिश्माचा जन्म १९७४ मध्ये ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. पण राज कपूर मात्र नातीला बघायला आले नव्हते. नातीला भेटायला येण्यापूर्वी त्यांनी एक अट ठेवलेली. ती म्हणजे, जर नवजात मुलीचे डोळे निळे असतील तरच ते तिला भेटायला येतील. बबिता म्हणाल्या की नशीब लोलोचे (करिश्मा कपूर) डोळे तिच्या आजोबांसारखे निळे होते त्यामुळे आम्ही देवाचे आभार मानलेले”. Kapoor family blue eyes history)

करिश्मा नंतर करिना कपूरचा मुलगा तैमुर(Taimur) याचे डोळे निळे आहेत आणि तोच वारसा रणबीर कपूरच्या मुलीने म्हणजेच राहा (Raha Ranbir Kapoor) हिने जपला असून तिचे देखील डोळे पणजोबांसारेखे निळेशार आहेत. ९० वर्षांपेक्षा अधिक काळ संपूर्ण कपूर कुटुंबाने हिंदी चित्रपटसृष्टीसाठी दिलं आहे याचं विशेष कौतुक….