
Karan Arjun : मेरे करण अर्जुन आयेंगे, मेरे करण अर्जुन आयेंगे….
निर्माता दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी १९९५ साली एक चित्रपट बनवला होता जो सुपर डुपर हिट झाला. सिनेमा होतात ‘करण अर्जुन’ (Karan Arjun). आज तीस वर्षानंतर देखील या चित्रपटाची सिनेसृष्टीमध्ये चर्चा होत असते. यातील डायलॉगवर आज देखील भरपूर मीम्स बनतात. पण हा चित्रपट बनवताना राकेश रोशन फारसे कॉन्फिडंट नव्हते या सिनेमाच्या यशाबाबत. कारण एकतर सिनेमाची स्टोरी लाईन हटके होती. भारतीय प्रेक्षक ती डायजेस्ट करतील का हा प्रश्न होता. राकेश रोशन यांनी अलीकडे दिलेले एका मुलाखतीत सांगितले की, “अभिनेत्री राखी यांनी या चित्रपटात बोललेला एक डायलॉग मला प्रचंड आत्मविश्वास देऊन गेला आणि त्या क्षणी मला वाटले की हा चित्रपट नक्कीच चालणार!!” कोणता होता तो डायलॉग? आणि काय होता नेमका किस्सा?

राकेश रोशन यांनी ‘करण अर्जुन’ (Karan Arjun) या चित्रपटाची निर्मिती सुरू करताना सुरुवातीला यात अजय देवगन आणि शाहरुख खान यांची निवड केली होती. चित्रपटाचे नाव ठरले होते ‘कायनात’ पण नंतर असे काही प्रसंग घडले की अजय देवगन चित्रपटातून बाहेर पडला आणि सलमान खानची चित्रपटात एंट्री झाली. चित्रपटाचे नाव देखील बदलले आता सिनेमाचे नाव ‘करण अर्जुन’ असे झाले. करणच्या भूमिकेमध्ये सलमान खान तर अर्जुनच्या भूमिकेमध्ये शाहरुख खान. ठाकूरच्या भूमिकेमध्ये अमरीश पुरी तर आईच्या भूमिकेमध्ये राखी.
काजोल आणि ममता कुलकर्णी नायिकांच्या भूमिकेमध्ये होत्या. सिनेमाची स्टोरी लाईन थोडीशी वेगळी होती. कारण तोवर पुनर्जन्मावर आधारित अनेक चित्रपट आले होते पण त्यामध्ये लव स्टोरी जास्त होत्या. दोन भाऊ पुन्हा पुन्हा जन्म घेतात हा कन्सेप्ट नवीन होता आणि राकेश रोशन यांना हीच काळजी होती की प्रेक्षक हा विषय डायजेस्ट करतील का? दुसरं शाहरुख खान आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र आले होते आणि त्यात पुन्हा ॲक्शन फिल्ममध्ये एकत्र आले होते. सलमान खानची तो वरची इमेज ही रोमँटिक बॉय म्हणून होती. शाहरुख देखील रोमँटिक सोबत निगेटिव्ह भूमिका त्या काळात करत होता. त्यामुळे सगळाच हा प्रकार एक्सपरिमेंटल असा होता. त्यामुळे राकेश रोशन यांना धास्ती होती की हा विषय दर्शक एक्सेप्ट करतील का? पण या सिनेमात राखीचा तो सुप्रसिद्ध डायलॉग ज्या दिवशी चित्रित झाला. त्या दिवशी राकेश रोशन निर्धास्त झाले.

हा डायलॉग होता ‘ मेरे करण अर्जुन आयेंगे… मेरे करण अर्जुन आयेंगे..’ हा डायलॉग बोलताना राखीच्या चेहऱ्यातील द्वेष, राग, उदासी आणि आशावाद हा त्यांनी आपल्या संवाद आणि डोळ्यातून इतक्या चांगल्या प्रकारे दाखवला की राकेश रोशन म्हणाले प्रेक्षक नक्की राखीच्या भावनांशी कनेक्ट होतील आणि चित्रपटाला जबरदस्त असे यश मिळेल. हा डायलॉग चित्रपटाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. इमोशनली चार्ज असा हा डायलॉग होता.
आता राकेश रोशन निर्धास्त झाले होते आणि झाले तसेच. आज ३० वर्षानंतर देखील ‘मेरे करण अर्जुन आयेंगे….’ हा राखीचा डायलॉग समाज माध्यमांमध्ये अनेक मीम्सच्या स्वरूपात फिरत असतो. या चित्रपटातील आणखी देखील काही डायलॉग प्रेक्षकांना आज देखील पाठ आहेत. जसा आसिफ शेख चा ‘व्हाट अ जोक..’ किंवा अमरीशचा ‘हम खानदानी ठाकूर है. हमारे रगो में खून के साथ साथ जिद और अहंकार भी दौडता है’ (Entertainment mix masala)
============
हे देखील वाचा : Sohrab Modi : रुपेरी पडद्यावरील राजबिंडा सिंह
============
हा चित्रपट १३ जानेवारी १९९५ ला प्रदर्शित झाला सुपरहिट झाला. यातील ‘जाती हू मै जल्दी है क्या या गाण्याने तर कल्ट क्लासिक चा दर्जा मिळवला. एकूणच नव्वद च्या दशकात ‘करण अर्जुन’ (Karan Arjun) या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. शाहरुख खानसाठी तर हे वर्ष महत्त्वाचा ठरले. कारण १९९५ या वर्षी शाहरुख खानचे तब्बल सात चित्रपट प्रदर्शित झाली होती ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट देखील याच वर्षी आला होता. ‘करण अर्जुन’ हा चित्रपट ‘डीडीएलजे’च्या नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. शाहरुख आणि सलमान ही जोडी यानंतर मात्र पुन्हा एकत्र आले नाहीत. पण दोघांच्याही सिने करीअर मधील हा एक महत्त्वाचा आणि दिशा देणारा चित्रपट ठरला हे नक्की.