Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”;

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती

स्वतःला समजून घेण्यासाठी Actress Manisha Koirala ने केली ब्रेन मॅपिंग; काय

Operation Sindoor च्या  पार्श्वभूमीवर Aamir Khanने ‘सितारे जमीन पर’ सिनेमाबद्दल घेतला मोठा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Karan Arjun : मेरे करण अर्जुन आयेंगे, मेरे करण अर्जुन आयेंगे….

 Karan Arjun : मेरे करण अर्जुन आयेंगे, मेरे करण अर्जुन आयेंगे….
बात पुरानी बडी सुहानी

Karan Arjun : मेरे करण अर्जुन आयेंगे, मेरे करण अर्जुन आयेंगे….

by धनंजय कुलकर्णी 17/02/2025

निर्माता दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी १९९५ साली एक चित्रपट बनवला होता जो सुपर डुपर हिट झाला. सिनेमा होतात ‘करण अर्जुन’ (Karan Arjun). आज तीस वर्षानंतर देखील या चित्रपटाची सिनेसृष्टीमध्ये चर्चा होत असते. यातील डायलॉगवर आज देखील भरपूर मीम्स बनतात. पण हा चित्रपट बनवताना राकेश रोशन फारसे कॉन्फिडंट नव्हते या सिनेमाच्या यशाबाबत. कारण एकतर सिनेमाची स्टोरी लाईन हटके होती. भारतीय प्रेक्षक ती डायजेस्ट करतील का हा प्रश्न होता. राकेश रोशन यांनी अलीकडे दिलेले एका मुलाखतीत सांगितले की, “अभिनेत्री राखी यांनी या चित्रपटात बोललेला एक डायलॉग मला प्रचंड आत्मविश्वास देऊन गेला आणि त्या क्षणी मला वाटले की हा चित्रपट नक्कीच चालणार!!” कोणता होता तो डायलॉग? आणि काय होता नेमका किस्सा?

राकेश रोशन यांनी ‘करण अर्जुन’ (Karan Arjun) या चित्रपटाची निर्मिती सुरू करताना सुरुवातीला यात अजय देवगन आणि शाहरुख खान यांची निवड केली होती. चित्रपटाचे नाव ठरले होते ‘कायनात’ पण नंतर असे काही प्रसंग घडले की अजय देवगन चित्रपटातून बाहेर पडला आणि सलमान खानची चित्रपटात एंट्री झाली. चित्रपटाचे नाव देखील बदलले आता सिनेमाचे नाव ‘करण अर्जुन’ असे झाले. करणच्या भूमिकेमध्ये सलमान खान तर अर्जुनच्या भूमिकेमध्ये शाहरुख खान. ठाकूरच्या भूमिकेमध्ये अमरीश पुरी तर आईच्या भूमिकेमध्ये राखी.

काजोल आणि ममता कुलकर्णी नायिकांच्या भूमिकेमध्ये होत्या. सिनेमाची स्टोरी लाईन थोडीशी वेगळी होती. कारण तोवर पुनर्जन्मावर आधारित अनेक चित्रपट आले होते पण त्यामध्ये लव स्टोरी जास्त होत्या. दोन भाऊ पुन्हा पुन्हा जन्म घेतात हा कन्सेप्ट नवीन होता आणि राकेश रोशन यांना हीच काळजी होती की प्रेक्षक हा विषय डायजेस्ट करतील का? दुसरं शाहरुख खान आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र आले होते आणि त्यात पुन्हा ॲक्शन फिल्ममध्ये एकत्र आले होते. सलमान खानची तो वरची इमेज ही रोमँटिक बॉय म्हणून होती. शाहरुख देखील रोमँटिक सोबत निगेटिव्ह भूमिका त्या काळात करत होता. त्यामुळे सगळाच हा प्रकार एक्सपरिमेंटल असा होता. त्यामुळे राकेश रोशन यांना धास्ती होती की हा विषय दर्शक एक्सेप्ट करतील का? पण या सिनेमात राखीचा तो सुप्रसिद्ध डायलॉग ज्या दिवशी चित्रित झाला. त्या दिवशी राकेश रोशन निर्धास्त  झाले.

हा डायलॉग होता ‘ मेरे करण अर्जुन आयेंगे… मेरे करण अर्जुन आयेंगे..’  हा डायलॉग बोलताना राखीच्या चेहऱ्यातील द्वेष, राग, उदासी आणि आशावाद हा त्यांनी आपल्या संवाद आणि डोळ्यातून इतक्या चांगल्या प्रकारे दाखवला की राकेश रोशन म्हणाले प्रेक्षक नक्की राखीच्या भावनांशी कनेक्ट होतील आणि चित्रपटाला जबरदस्त असे  यश मिळेल. हा डायलॉग चित्रपटाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. इमोशनली चार्ज असा हा डायलॉग होता.

आता राकेश रोशन निर्धास्त झाले होते आणि झाले तसेच. आज ३० वर्षानंतर देखील ‘मेरे करण अर्जुन आयेंगे….’ हा राखीचा डायलॉग समाज माध्यमांमध्ये अनेक मीम्सच्या  स्वरूपात फिरत असतो. या चित्रपटातील आणखी देखील काही डायलॉग प्रेक्षकांना आज देखील पाठ आहेत. जसा आसिफ शेख चा ‘व्हाट अ जोक..’ किंवा अमरीशचा ‘हम खानदानी ठाकूर है. हमारे रगो में खून के साथ साथ जिद और अहंकार भी दौडता है’ (Entertainment mix masala)

============

हे देखील वाचा : Sohrab Modi : रुपेरी पडद्यावरील राजबिंडा सिंह

============

हा चित्रपट १३ जानेवारी १९९५ ला प्रदर्शित झाला सुपरहिट झाला. यातील ‘जाती हू मै जल्दी है क्या या गाण्याने तर कल्ट क्लासिक चा दर्जा मिळवला. एकूणच नव्वद  च्या दशकात ‘करण अर्जुन’ (Karan Arjun) या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. शाहरुख खानसाठी तर हे वर्ष महत्त्वाचा ठरले. कारण १९९५ या वर्षी शाहरुख खानचे तब्बल सात चित्रपट प्रदर्शित झाली होती ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट देखील याच वर्षी आला होता. ‘करण अर्जुन’ हा चित्रपट ‘डीडीएलजे’च्या नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. शाहरुख आणि सलमान ही जोडी यानंतर मात्र पुन्हा एकत्र आले नाहीत. पण दोघांच्याही सिने करीअर मधील हा एक महत्त्वाचा आणि दिशा देणारा चित्रपट ठरला हे नक्की.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured karan arjun Rakesh Roshan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.