मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास का दिलेला नकार?
९०च्या दशकातील जनरेशनचा आवडता चित्रपट म्हणजे ‘दिल तो पागल है’ (Dil To Pagal Hai) … करिश्मा कपूरचं सौंदर्य आणि माधुरी दीक्षितचं उत्कृष्ट नृत्य यांचा संगम या चित्रपटात परफेक्ट मॅच झाला होता… आणि त्यातही रोमॅंटिक भूमिकेचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याने चार चांद लावले होते… पण तुम्हाला माहित हे का धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत ‘दिल तो पागल है’ चित्रपटात काम करण्यास थेट करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने आधी नकार दिला होता… आता त्याचं कारण स्वत:च करिश्मा कपूरने सांगितलं आहे… जाणून घेऊयात काय म्हणाली करिश्मा?….(Entertainment News)

खरं तर माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) स्क्रिन किंवा डान्सचा स्टेज शेअर करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते… मात्र, करिश्माने ‘दिल तो पागल है’ या कल्ट क्लासिक चित्रपटासाठी आधी नकार दिला होता… याबद्दल करिश्मा कपूर २०२४ मध्ये ‘लेडी स्टडी’ ग्रुप या कार्यक्रमात बोलताना म्हणाली होती की, “‘दिल तो पागल है’साठी प्रत्येक अभिनेत्रीने नकार दिला होता. खरं सांगायचं तर, यात मीसुद्धा आहे. कारण कोणालाच माधुरी दीक्षितबरोबर काम करायचं नव्हतं.”

पुढे ती म्हणाली की, “माधुरीसोबत कामाला नकार हा तिच्याबरोबरची स्पर्धा किंवा मत्सर यामुळे नव्हता, तर माधुरीच्या उत्कृष्ट नृत्यकौशल्यामुळे होता. कोणालाच तिच्याबरोबर नृत्य करायचं नव्हतं. यासाठी मी आधी नकार दिला होता. पण जेव्हा मी पटकथा ऐकली, तेव्हा मला वाटलं की हा चित्रपट मला करायलाच हवा. माझ्या आईनेही मला यासाठी प्रोत्साहन दिलं आणि नृत्यासाठी मेहनत घ्यायला मदत केली. नंतर हा चित्रपट आयकॉनिक ठरला. यानिमित्ताने शाहरुख, माधुरी आणि यश चोप्रांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली.”(Dil To Pagal Hai Movie)
================================
हे देखील वाचा : Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
=================================
या चित्रपटाची आणखी एक मजेशीर बाब म्हणजे आधी माधुरी दीक्षितच्या भूमिकेसाठी श्रीदेवी (Sridevi) यांना यश चोप्रांनी अप्रोच केलं होतं… पण श्रीदेवींना असं वाटलं की त्यांच्या ‘लम्हे’ चित्रपटातील भूमिकेसारखी ही भूमिका नाही आणि म्हणून त्यांनी नकार दिला होता. नंतर ज्यावेळी माधुरी दीक्षितला पूजा या भूमिकेसाठी फायनल केल्यानंतर निशा या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्री शोधणं यश चोप्रांसाठी अवघड झालं. पण अखेर करिश्मा कपूर हिच्या पारड्यात दिल तो पागल है चित्रपट पडला आणि प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसादासोबतच बॉक्स ऑफिसवरही ‘दिल तो पागल है’ चित्रपटाने तुफान कमाई केली होती…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi