‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कस्तुरबा ते आईआज्जी
गेली चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ या क्षेत्रात सहजपणे वावरणाऱ्या आणि मानाने प्रेमळ असणाऱ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. त्या मुळात पुण्याच्या. त्यांच्या आईने त्यांना लहानपणी नृत्याच्या क्लासला घातले होते. ‘मंतरलेले पाणी’ नावाच्या नाट्यप्रयोगासाठी त्यांची निवड झाली. त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सुंदर मी होणार’ नाटकात राज्य नाट्य स्पर्धेसाठी त्यांनी ‘बेबीराजे’ ही भूमिका केली. त्यासाठी त्यांना रौप्य पदक मिळाले.
शास्त्र शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एन एस डी साठी अर्ज केला. मग तेथून मुलाखतीसाठी बोलावणे आले आणि मग एन एस डी मधील शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. ती तीन वर्षे म्हणजे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच अनुभवांचा खजिना ठरत असतो.
एन एस डी मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ‘चांगुणा’ मध्ये आणि त्यानंतर ‘कस्तुरीमृग’ नाटकात भूमिका केल्या. जयदेव हट्टंगडी हे त्यांचे पती. त्यांना सासरहून देखील या करिअरसाठी खूप प्रोत्साहनच मिळालं.
हेही वाचा : आंतर सांस्कृतिक चित्रपट
जेव्हा ‘गांधी’ चित्रपटातील ‘कस्तुरबा’ ही भूमिका मिळाली, तेव्हा प्रथम त्यांनी ‘सत्याचे प्रयोग’ संपूर्ण वाचले. मणिभवन येथे जाऊन गांधीजींची आणि कस्तुरबांची छायाचित्रे पाहिली. ‘हमारी बा’ आणि ‘बा और बा कि शीतल छायाये’ ही पुस्तके वाचली. शूटिंगच्या आधी एक महिना कलाकारांना दिल्ली येथे वास्तव्याला नेण्यात आले होते. तिथे रोहिणीताई चरखा शिकल्या आणि इंग्रजी उच्चारांवर त्यांनी विशेष मेहनत घेतली. बेन किंग्जले यांनी ‘गांधी’ साकारले होते. त्यावेळी रोहिणीताई वयाने खूप लहान होत्या आणि त्यांनी हे मोठे आव्हान पेललं होतं. या भूमिकेसाठी त्यांना ‘बाफ्टा’ या अतिशय प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रोहिणीताईनी अनेक चित्रपटात ‘आई’ ची भूमिका केली. प्रत्येक चित्रपटातील आई वेगळी होती. ‘प्रेमाची गोष्ट’ नावाच्या चित्रपटात त्यांनी अतुल कुलकर्णी यांची आई साकारली होती. त्यांनी अनेक तेलगू चित्रपटात काम केलं आहे. ‘मोहट्याची रेणुका’ नंतर दहा वर्षांनी त्यांनी ‘प्रेमाची गोष्ट’ मध्ये काम केलं होत. ‘मुंबई पुणे मुंबई ३’ मध्ये सुद्धा त्यांची भूमिका होती. ‘पार्टी’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालं होतं. ‘अग्नीपथ’ आणि ‘अर्थ’ साठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच संगीत नाटक अकादमीचा अतिशय महत्वाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
हे वाचा : पुन्हा एकदा चार दिवस सासूचे
‘चार दिवस सासूचे’ मध्ये तर त्यांनी अकरा वर्षे सासूची भूमिका केली आहे. सलग अकरा वर्षे एक भूमिका करणे हे आव्हान होतं. ‘चालबाज’ मधील त्यांची भूमिका खूपच वेगळी होती. सारांश, पार्टी, प्रतिघात, पुकार, मोहन जोशी हाजीर हो, अग्नीपथ, हिरो हिरालाल अशा कित्येक चित्रपटात त्यांनी उत्तम भूमिका केल्या. होणार सून मी ह्या घरची मधील त्यांच्या आईआज्जी आजही लक्षात आहेत. तसेच ‘आम्ही जगतो बेफाम’ मधील ‘ग्रॅनी’ सुद्धा लक्षात आहे.
आता दसऱ्यापासून सुरु होणाऱ्या ‘सुखी माणसाचा सदरा’ मध्ये देखील त्या महत्वाच्या भूमिकेत आहेत. स्वभावाने अतिशय प्रेमळ असणाऱ्या रोहिणीताईंना आमचा मानाचा मुजरा.