
Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील, अर्थ आहे फारच सुंदर
जितकी चर्चा विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या आई-बाबा होण्याची झाली होती, त्यापैकी जास्त चर्चा सध्या त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव काय ठेवलं असेल याची सुरु होती. खरं तर आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या मुलांची नावं जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उस्तुक असतात. आणि आता अखेर विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या मुलाचं नाव समोर आलं असून त्यांनी आपल्या बाळासोबतचा क्युट फोटो देखील सोशल मिडियावर शेअर केला आहे. (Bollywood News)

तर, विकी आणि कॅटरिना यांनी इतर सेलिब्रिटी कपलप्रमाणेच आपल्या मुलाचं हटके नाव ठेवलं आहे. त्यांनी आपल्या लाडक्या बाळाचं नाव विहान ठेवलं आहे. सोशल मिडियावर विकी कौशल आणि कॅटरिना यांनी लेकाचा चिमुकला हात दोघांनी हातात घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये मुलाचं नाव रिव्हील करत लिहिलं आहे की, “’आमचा लाडका विहान कौशल. प्रार्थनांना यश आलं. आयुष्य खूप सुंदर आहे. विहानच्या जन्मानंतर आमचं जग क्षणार्धात बदललं. आभार मानायला शब्द अपुरे पडत आहेत”…दरम्यान, विहान हा संस्कृत शब्द असून या नावाचा अर्थ नवी सुरुवात असा होतो. विकी आणि कॅटरिनाच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (Vihan Vicky Kaushal)
================================
================================
दरम्यान, या दोघांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, २०२५ मध्ये विकी कौशल ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात दिसला होता. आणि आता लवकरच महावतार, ‘लव्ह एण्ड वॉर’ (Love and War) या चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे. तर, कॅटरिना २०२४ मध्ये आलेल्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने काही काळ मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला. आणि आता लवकरच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासोबत ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi