
Katrina Kaif :ससुराल गेंदा फूल! मैत्रिणीच्या हळदीला ‘पंजाबी बहू’ने धरला ठेका
हिंदी चित्रपटसृष्टीची बार्बी डॉल अर्थात कॅटरिना कैफ सध्या चित्रपटांपासून दुर असून ‘परफेक्ट देसी बहु’ बनून ती आपला संसार सांभाळतेय. विकी कौशल सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अस्सल पंजाबी झालेली कॅटरिना कधी सासूसोबत तर कधी इतर कुटुंबियांसोबत सण, फॅमिली फंक्शनला जाताना दिसते. नुकताच ती‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसली सोशल मिडीयावर सध्या या व्हिडिओने धुमाकूळ घातला असून परफेक्ट बहु असा टॅग कॅटरिना नेटकरी देत आहेत. (Katrina Kaif)
एकीकडे पत्नी म्हणून विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचं यश त्यांच्यासोबत सेलिब्रेट करताना दिसलेली Katrina Kaif नुकतीच तिच्या एका मैत्रिणीच्या हळदीत ‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावर थिरकता दिसली. या गाण्यावर धरलेला ठेका आणि पंजाबी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या कॅटरिनाचा देसी अंदाज सगळ्यांनाच भावला आहे. कॅटरिना इन्जॉय करत असणाऱ्या या हळदीला विकी कौशलसह सनी कौशल आणि Sharvani Wagh देखील हजर होते. (Entertainment masala)

कॅटरिना कैफ सध्या आदर्श सूनेची ड्यूटी अगदी चोख बजावत असल्याचं दिसतंय. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी कौशल विविध ठिकाणी फिरत असल्यामुळे त्याच्या आईला म्हणजेच सासूला महाकुंभला घेऊन जात तिच्यासोबत कॅटरिनाने गंगास्नान केले होते. याशिवाय शिर्डीलाही सासूला घेऊन ती साईबाबांच्या दर्शनाला गेली होती. त्यामुळे जरी इंडस्ट्रीपासून कॅटरिना लांब असली तरी परफेक्ट सून ही भूमिका निभावणाऱ्या कॅटरिनाचं तिचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. तसेच, लवकरच ती Tiger vs Pathaan या चित्रपटात झळकणार आहे. (Bollywood upcoming movie)
============
हे देखील वाचा : या 7 हिंदी चित्रपटांसाठी निवड करण्यात आलेल्या कलाकारांना अचानक काढून टाकण्यात आले
============
कॅटरिना कैफ हिने २००३ मध्ये ‘बुम’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. मेघना रेड्डी हिच्या जागी कॅटरिनाची रिप्लेसमेंट करत बुम चित्रपटात कॅटरिना दिसली होती. त्यानंतर ‘मैने प्यार क्यू किया’, ‘सरकार’, ‘पार्टनर’, ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘न्युयॉर्क’, ‘राजनीती’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.