Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

गरोदर कॅटरिनाचे फोटो लीक; Sonakshi Sinha भडकली मीडियावर…
काही दिवसांपूर्वीच कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती… बऱ्याच वर्षांपासून त्यांचे चाहते जी बातमी ऐकण्यासाठी आतुर होते ती न्यूज अर्थातन कॅटरिना आई होणार असं त्यांनी सोशल मिडियवरुन एक फोटो पोस्ट करत जाहिर केलं होतं… त्यांच्याच घरात विकी आणि कॅटरिनाचा बेबी बम्पचा तो फोटो क्षणार्धात व्हायरल झाला होता.. परंतु, आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिने या प्रकरणावर राग व्यक्त करत मीडियाला त्यांची प्रायव्हसी लीक केल्याबद्दल खडेबोल सुनावले आहेत… नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…
सोनाक्षी सिन्हाने माडिया पोर्टलने विकी आणि कॅटरिनाचा फोटो पोस्ट करण्यावरुन त्यांच्या या कृत्यावर टीका केली आहे.. या फोटोत कॅटरिना आपल्या घरातील बाल्कनीत बसलेली दिसत आहे… आणि हा फोटो एका पोर्टलवरुन शेअर करण्यात आला आहे… सोनाक्षीने या फोटोच्या एका पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे की, “तुम्हाला काय झाले आहे????? तिच्याच घरात एका महिलेचे तिच्या संमतीशिवाय फोटो काढणे आणि ते सार्वजनिक व्यासपीठावर शेअर करणे???? तुम्ही लोक गुन्हेगारांपेक्षा कमी नाहीत. हे लज्जास्पद आहे.” कतरिना कैफ किंवा विकी कौशल या दोघांनीही अद्याप व्हायरल फोटोंवर प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहत्यांनीही या घटनेवर टीका केली असून गोपनीयतेचे उल्लंघन करत असल्याचं म्हटलं जात आहे… (Vicky and Katrina Parents to be)

सप्टेंबर २०२५ मध्ये कॅटरिना आणि विकीने सोशल मीडियावर एक गोड फोटो शेअर करून लवकरच त्यांच्या घरी लहान बाळाचं आगमन होणार असल्याचीआनंदाची बातमी सांगितली होती… या फोटोत विकी कॅटरिनाच्या बेबी बंपला प्रेमाने पाहताना दिसत होता… दरम्यान, असं म्हटलं जात आहे की विकी आणि कॅटरिना भारतात नाही तर परदेशात बाळाला जन्म देणार आहेत… अर्थात याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही आहे… (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Vicky Kaushal : ‘छावा ‘ओटीटीवर कुठे आणि कधी पाहाल?
================================
दरम्यान, विकी कौशल याच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात तो दिसला होता… लवकरच ‘लव्ह अॅण्ड वॉर’ आणि ‘महावतार नरसिंहा’ चित्रपटात तो झळकणार आहे… तर, कॅटरिना कैफ २०२४ मध्ये मेरी क्रिसमस चित्रपटात शेवटची विजय सेतुपतीसोबत दिसली होती…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi