Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये कुणाशी भिडणार?
अभिनेते के के मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी ‘स्पेशल ऑप्स’ वेब सीरीज प्रेक्षकांना विशेष आवडली. सीरीजच्या पहिल्या भागात हिम्मत सिंग कसा घडला हे प्रेक्षकांना कथानकातून पाहायला मिळालं. आणि सीरीजच्या दुसऱ्या भागात ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ (Special Ops 2) मध्ये सर्व Raw Agents नव्या मिशनवर जाणार आहेत. नुकतीच सीझनच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून के के मेनन अर्थात कर्तव्यदक्ष आणि तडफदार हिम्मत सिंग अनोख्या अंदाजात भेटीला येणार आहे. (Bollywood masala)

जिओ+हॉटस्टारवर ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ची घोषणा करण्यात आली असून यामध्ये Raw च्या मुख्यालयात पुन्हा एकदा सर्व अधिकारी एका मिशनसाठी सज्ज होताना दिसणार आहेत. सीरीजच्या दुसऱ्या भागाची झलक शेअर करण्यात आली असून यात हिम्मत सिंग त्याच्या सर्व साथीदारांना घेऊन पुन्हा एकदा मिशन लीड करतोय. विनय पाठक, सय्यामी खेर हे हिम्मत सिंगचे सहकारी विविध ठिकाणी शत्रूंना नेस्तनाबूत करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यात के के मेनन अभिनेते प्रकाश राज यांच्यासोबत भिडणार आहेत. (Entertainment news)
================================
हे देखील वाचा: Hera Pheri 3 : बाबू भैय्या नंतर श्यामचीही हेरा फेरीतून एक्झिट?
=================================
दरम्यान, ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ (Special Ops 2) ची झलक दाखवणारा व्हिडीओ जरी शेअर केला असला तरी अद्याप रिलीज डेट गुलदस्त्यात आहे. येत्या १-२ महिन्यांमध्ये नक्कीच सीरीज रिलीज होईल असा अंदाज बांधण्यात हरकत नाही. या सीरिजमध्ये के के मेनन यांच्यासह विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या भागात सर्व रॉ एजन्ट्स कोणत्या नव्या मिशनवर असणार हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. (Web series news update)