Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Kedar Shinde : “कदाचित कोंबडी पळाली हे गाणं जत्रा मध्ये नसतं….”; काय होता किस्सा?
मराठी चित्रपटसृष्टीत गावाकडच्या कथा कायमच महत्वाचं आकर्षण आणि केंद्रबिंदू राहिल्या आहेत… अशाच एका गावाची आणि तिथल्या अनोख्या परंपरेची कथा सांगणारा एक विनोदी चित्रपट आला होता तो म्हणजे ‘जत्रा’.. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव (Bharat Jadhav) आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका होत्या… चित्रपटाची कथा, प्रत्येक कलाकाराचा अभिनय तर गाजलाच पण चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने इतिहासच रचला… पण तुम्हाला माहित हे का PETA मुळे या गाण्यावर बंदी आली असती… नेमका काय होता हा किस्सा जाणून घेऊयात…(Kedar Shinde)

केदार शिंदे यांच्या मल्टिस्टारर चित्रपटात भरत जाधव, क्रांती रेडकर, प्रिया बेर्डे तसेच सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, उपेंद्र लिमये यांसारख्या तडग्या कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती… २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ‘ये गो ये मैना’,’ कोंबडी पळाली’ ही गाणी सुपरहिट ठरली होती… अजय-अतुल यांनी या गाण्यांची निर्मिती केली होती… या गाण्याचा विशेष किस्सा नुकताच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदेंनी सांगितला… ते म्हणाले की,” कदाचित हे गाणं कधी आलंच नसतं. हे गाणं शूट झालं, एडिट झालं. त्यानंतर चित्रपट सेन्सॉर झाला आणि त्याच संध्याकाळी PETAचा प्राण्यांच्याबाबतीत नियम आला… जर तो नियम त्याच्या एक दिवस आधी जरी आला असता तर मला हे गाणं चित्रपटातून काढून टाकावं लागलं असतं. कारण या गाण्यात खूप कोंबड्या दिसत आहेत, त्यामुळे त्यांनी मला ही कधीच परवानगी दिली नसती.”(Marathi Movies)

पुढे केदार असं म्हणाले की,” आज जर एखादी कोंबडी जरी दिसली तरी त्याचं सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागतं… इथे तर कोंबड्यांचा बाजारच मांडला होता… पण, लोकांना हे गाणं फारच आवडलं. आता ज्या प्रकारे सोशल मिडिया आहे तसाच सोशल मिडिया जर का तेव्हा असता तर गाणं अजून हिट झालं असतं… शिवाय त्याचा चित्रपटाच्या रिलीजला देखील अधिक फायदा झाला असता… पण, हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं ते जेव्हा जत्रा चित्रपट सॅटलाईटवर प्रदर्शित झाला तेव्हा… त्यानंतर प्रेक्षकांनी गाणं उचलून धरलं जे आजपर्यंत सुपरहिट आहे…” (Entertainment News)
================================
=================================
‘जत्रा-ह्यालागाड त्यालागाड’ या चित्रपटाने खरंच प्रेक्षकांना विनोदाची एक वेगळीच पर्वणी देऊ केली होती… काही रिपोर्टनुसार २००६ मध्ये या चित्रपटाने ९७-९८ लाखांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती… खरं तर आता पुन्हा एकदा जत्रा सारख्या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांसमोर यायला हवं यात तिळमात्र शंका नाही… (Jatara marathi movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi