केजीएफ-२ लांबणीवर ??
कन्नड सुपरस्टार यश आणि संजय दत्त यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला केजीएफ-२ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. केजीएफ-१ हा देमार स्टाईल चित्रपट सुपरहीट ठरला. त्यामुळे आता दुसऱ्या भागाची सर्वांना उत्कंठा आहे.
केजीएफ च्या पुढच्या भागात अधीरा कोण असेल याची उत्सुकता होती. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी 29 जुलै रोजी अधीरा कोण हे गुपीत उघड केलं. अभिनेता संजय दत्त अधिराची भूमिका साकारत आहे. 29 जुलै रोजी अधिराच्या लुकमधील संजय दत्त यांचे पोस्टर रिलीज झाले आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढली.
सोन्याच्या खाणींवर वर्चस्व ठेवण्यासाठी चाललेली रक्तरंजीत कहाणी या केजीएफ सिरीजमध्ये आहे.आता दुस-या भागातही पहिल्या भागातील देमार कहाणी पुढे असणार की त्यापेक्षाही काही जास्त बघायला मिळणार ही उत्सुकता होतीच. शिवाय अधीरा कोण हा प्रश्नही होता.
कारण पहिल्या भागात या अधीराचा फक्त आवाजच होता आता अधीरा कोण हे स्पष्ट झालं त्यासोबत रविना टंडन, श्रीनिधी शेट्टी, बालकृष्ण, इनायत खलील, अनंत नाग, मालविका अविनाश, सरण शक्ती, अच्युत कुमार यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल हेही सांगितले.
पण आता नेमकं अधीराची भूमिका करणा-या संजय दत्त यांना कर्करोगाची लागण झाल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे. अर्थात संजय दत्त यांचे ९५% शुटींग झालेले असल्याने आता यावर काय मार्ग टीम काढते याकडे सर्वांचे लक्ष आहे
२०१९ मध्ये कोलार गोल्ड फील्ड्समधील सायनाईड टेकड्यांमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरण सुरुवात झाली.चित्रपट २३ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित होणार अशी चर्चा होती.हिंदी, मल्याळम, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये डब होणारा हा चित्रपट 2020 चा मोठा धमाका असेल अशीही अटकळ आहे.केजीएफ 2 चे निर्माते ऑगस्टमध्ये चित्रपटाचे शूट पुन्हा सुरू करण्याच्या विचारात होते.चित्रपटासाठी अद्याप किमान १५ दिवस शूट करावे लागणार आहे.पण कोरोनाच्या वाढत्या संकंटाचा फटका या शूटलाही बसला.त्यामुळे आता केजीएफ-2 चे सर्वच शेड्यूल पुढे झाले असून २०२१ च्या जानेवारीमध्ये संक्रातीदरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होईल अशीही अटकळ आहे.
सई बने