Farah Khan बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानचा संघर्षमयी प्रवास
Khal Nayak : जेव्हा ‘हे’ दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले!
आपल्या बॉलिवूडची एक गंमत असते तिथे बऱ्याचदा एकाच विषयावरचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत असतात. मध्यंतरी भगतसिंग यांच्यावरील तीन-चार चित्रपट एकाच वेळी एकाच दिवशी प्रदर्शित झाले. मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांवरील अनेक चित्रपट एकाच वर्षात प्रदर्शित झाले होते. कधी कधी चित्रपटाच्या शीर्षका शी साधर्म्य असलेल्या नावाचे चित्रपट त्याच काळात प्रदर्शित होतात. (Khal Nayak)
लोकप्रिय चित्रपटांचा फोकस आपल्याकडे यावा हा यातील एक सुप्त हेतू असतो. (साठच्या दशकाच्या अखेरीस आय एस जोहरने ‘मेरा नाम जोकर’ सोबत ‘मेरा नाम जोहर’ हा सिनेमा बनवला आणि प्रदर्शित केला होता.) बऱ्याचदा एखादा बिग बजेट चित्रपट येऊ घातलेला असतो त्या चित्रपटाच्या शीर्षकाशी साधर्म्य असलेले नाव घेऊन चित्रपट बनवला जातो! अर्थात मायबाप प्रेक्षक वर्ग योग्य चित्रपटालाच प्रतिसाद देतात पण या गमतीजमती बॉलिवूडमध्ये फार पूर्वीपासून होत होत्या. (Khal Nayak)
१९९३ साली एकदा असाच एक प्रसंग आला होता. तेव्हा शोमन सुभाष घई ‘खलनायक’ (Khal Nayak) हा चित्रपट बनवत होते. हा चित्रपट त्यांच्या एकूणच चित्रशैलीला साजेसा असा भव्य दिव्य मल्टीस्टारर चित्रपट होता. यात संजय दत्त, Madhuri Dixit, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट जेव्हा Subhash Ghai यांनी लाँच केला त्याच वेळी निर्माता दिग्दर्शक सावन कुमार टाक यांनी या चित्रपटाच्या टायटलला साधर्म्य असलेले ‘खलनायिका’ हे टायटल घेऊन एका चित्रपटाची घोषणा केली.
सुभाष घई यांना आधी तो विनोद वाटला. पण जेव्हा सावन कुमार यांनी या चित्रपटावर काम सुरू केले तेव्हा त्यांनी सावन कुमार यांना निरोप पाठवून कृपया हे शीर्षक बदला असे सांगितले. या दोन्ही सिमिलर टायटलमुळे आपल्या दोघांच्या चित्रपटांचे नुकसान होऊ शकते अशी भीती देखील व्यक्ती केली. पण सावन कुमार बधले नाहीत तेव्हा सुभाष घई यांनी रीतसर film association कडे तक्रार केली. त्यांनी दोघांच्या ही बाजू ऐकल्या. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे फिल्म असोसिएशनने दोघांनाही त्याच नावाने चित्रपट करायला सांगितले! (Entertainment mix masala)
सावन कुमार यांचे चित्रपटामध्ये जितेंद्र, जयाप्रदा, अनु अगरवाल, वर्षा उसगावकर, मेहमूद यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट १९९१ साली आलेल्या हॉलिवूडच्या The Hand That Rocks the Cradle. या चित्रपटाचा रिमेक होता. ‘खलनायक’ (Khal Nayak) आणि ‘खलनायिका’ ही दोन्ही नाव बऱ्यापैकीसारखी असल्यामुळे दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यात भरीस भर म्हणजे पुन्हा दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. सावन कुमार यांनी मुद्दाम हा मुहूर्त निवडला होता.
६ ऑगस्ट १९९३ या दिवशी दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार होते. पुन्हा सुभाष घई यांनी याबाबत तक्रार केली. पण सावन कुमार आपल्या रिलीज डेट बदलायला तयार नव्हते. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील एका महिलेने ‘Khal-Naaikaa’ हा चित्रपट आपल्या कथानकावर आधारलेला आहे असे सांगून त्यावर स्टे आणला! निर्माते ताबडतोब उत्तर प्रदेशला रवाना झाले पण तिथे वकिलांचा संप चालू होता. तरी त्यांनी एक वकील हायर करून या स्टेला स्थगिती मिळवली आणि ६ ऑगस्ट या दिवशीच हा चित्रपट रिलीज केला! अर्थात हा सावन कुमारचा हट्ट होता. दुराग्रह होता. चित्रपट अजिबात चालला नाही. ‘खलनायिका’ हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला! (Bollywood masala)
‘Khal Nayak’ या चित्रपटांमध्ये ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं प्रचंड त्या काळात गाजलं होतं या गाण्यामुळे संपूर्ण भारत देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. परंतु यामुळे सिनेमाची पॉप्युलरिटी वाढत होती. ही लोकप्रियता पाहून ‘खलनायिका’ या चित्रपटात देखील Saawan Kumar Tak यांनी ‘चोली के अंदर क्या है’ हे गाणं घेतलं होतं! परंतु याला सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतला आणि गाण्यात बदल करायला सांगितला त्यामुळे ‘चोली’ च्या ऐवजी ‘आंचल के अंदर क्या है…’ ह्या ओळी वापरल्या गेल्या. चित्रपटात हे गाणं वर्षा उसगावकर वर चित्रित झालं होतं. खलनायिकेची टायटल भूमिका अनु अग्रवाल हिने केले होते.
=============
हे देखील वाचा : C. Ramchandra : ‘या’ गाण्याची लोकप्रियता ७५ वर्षानंतरही कायम!
=============
‘आशिकी’ या चित्रपटामुळे तिचे सर्वत्र नाव झाले होते परंतु या निगेटिव्ह रोलमुळे चित्रपटाला काहीही प्रसिद्धी मिळाली नाही. ‘खलनायक’ (Khal Nayak) या चित्रपटासमोर ‘खलनायिका’ धारातीर्थी पडली. सुभाष घई यांचा ‘खलनायक’ हा चित्रपट मात्र धो धो चालला. याला देखील पार्श्वभूमी होती संजय दत्त याला टाडाखाली केलेल्या अटकेची. मार्च १९९३ ला मुंबईमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाले होते. यात आरोपी म्हणून संजय दत्तला अटक करण्यात आली होती. या बॉम्बस्फोटानंतर चार महिन्यांनी हा चित्रपट आला. या चित्रपटाच्या विरोधी देशभर भरपूर निदर्शन झाली. चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न झाला पण या सर्व पार्श्वभूमीवर सिनेमा सुपरहिट झाला!