
Siddharth-Kiara : चिमुकल्या मल्होत्राचं घरी जंगी स्वागत; समोर आले फोटो…
बॉलिवूडमधलं क्युट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Siddharth Malhotra and Kiara Advani)… नुकतंच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं असून सिनेविश्वासह त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे… दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कियाराला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून कियारा आणि चिमुकल्या परीचं घरी जंगी स्वागत करण्यात आलं आहे… या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत…(Bollywood News)

१५ जुलै २०२५ रोजी कियाराने गोंडस मुलीला जन्म दिला… सिद्धार्थने सोशल मिडियावर ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती… दरम्यान, इतर कलाकरांप्रमाणेच सिद्धार्थ-कियारानेही त्यांच्या मुलीचा चेहरा सध्यातरी न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे… असं असलं तरी तिचं स्वागत घरी कसं झालं याचे फोटो मात्र समोर आले आहेत…घरातील सर्व सदस्यांनी चिमुकलीचं थाटामाटात स्वागत केलं. सिड-कियाराच्या फॅन पेजेसवर या सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळाली. युनिकॉर्न बलून, गुलाबी हिंडोला आणि इतर आकर्षक खेळण्यांसह घर सजवलेलं दिसत आहे. यावर एक मेसेजही लिहिला असून त्यात, ‘आमच्या चिमुकल्या राजकुमारीचं या जगात स्वागत आहे. तुझ्या येण्याने आम्ही पुन्हा आयुष्यावर प्रेम करत आहोत. या अनमोल भेटीसाठी सिद्धार्थ-कियाराचे आभार. तुम्हाला खूप प्रेम”, असं लिहिलं आहे…(Entertainment News Tadaka)
================================
हे देखील वाचा : Kiara Advani : कुणी तरी येणार गं; कियारा-सिद्धार्थ होणार आई-बाबा!
=================================
सिद्धार्थ-कियारा यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर,सिद्धार्थ मल्होत्रा आगामी ‘परम सुंदरी’ चित्रपटात जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. तर कियारा अडवाणी ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एन.टी.आर (Jr NTR) यांच्यासोबत ‘वॉर २’ (War 2 movie) मध्ये झळकणार आहे… शिवाय, फरहान अख्तर याच्या ‘डॉन ३’ (Don 3 Movie) चित्रपटाचा ती भाग असणार होती;मात्र, गरोदरपणामुळे तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला होता..(Kiara Advani Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi