Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Celebrities Names : बॉलिवूडच्या कलाकारांची खरी नावं माहित आहेत का?
शेक्सपिअरने “नावात काय आहे?” असं म्हटलं आहे. एकाअर्थाने ते खरंच आहे म्हणा; कारण व्यक्तीची ओळख त्याच्या नावाने नाही तर कर्तृत्वाने समाजापर्यंत पोहोचते. तसंच काहीसं बॉलिवूडच्या (Celebrities name) बाबतीत आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनय, नृत्य, सौंदर्य, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या कलांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि करत आहेत. पण काही कलाकारांची स्क्रिनवरील किंवा इंडस्ट्रीमधील नावं आणि खरी नावं वेगवेगळी आहेत. यात दिलीप कुमार पासून ते अगदी शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक कलाकार आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल… (Bollywood celebrities)
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी विविध चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांमुळे आजन्म प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यांचं इंडस्ट्रीमधील नाव जरी दिलीप कुमार असलं तरी त्यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान असं होतं. पण कलांतराने त्यांनी दिलीप कुमार याच नावाने चित्रपट करुन हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. (Bollywood untold stories)

जितेंद्र. (Jitendra) लाखो करोडो महिला प्रेक्षकांचं प्रेम. जितेंद्र यांचा डान्स जितका फेमस होता तितकीच फेमस होती आणि अजूनही आहे ती म्हणजे त्यांची ड्रेसिंग आणि हेअर स्टाईल. तर सगळ्यांच्या लाडक्या जितू किंवा जितेंद्र यांचं खर नाव रवी कपूर असं आहे. मात्र, गेले अनेक वर्ष सगळ्यांच्या ह्रदयात जितेंद्र याच नावाने घर केलं आहे. (Entertainment tadaka)

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची आई ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांनी अजरामर चित्रपट भारतीय चित्रपटसृ्टीला दिले. नर्गिस या नावाने जगभर त्या प्रसिद्ध असल्या तरी त्यांचं खरं नाव फातिमा राशिद असं होतं. त्यांच्या आई जदानबाई या गायिका होत्या. कलेचा वारसा घरातून मिळालेल्या नर्गिस यांनी अभिनय कौशल्याने यशाची उंची गाठली. (Entertainment masala)

‘चुराके दिल मेरा….गोरीया चली’, आला ना डोळ्यांसमोर शिल्पा शेट्टीचाच चेहरा. इंडस्ट्रीतील शेट्टी बहिणींनी अभिनेत्यांना तोडीस तोड काम करत टफ फाईट दिली आहे. पण शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचं खरं नाव अश्विनी होते. पण एका ज्योतिष्याच्या सल्ल्यामिळे तिने मुळ नावात बदल करुन शिल्पा असं नावं ठेवलं आणि इंडस्ट्रीला मिळाली द शिल्पा शेट्टी. (Bollywood news)

==========================
हे देखील वाचा: Shreyas Talpade : “आईच्या हट्टामुळे बॅंकेत नोकरीही केली पण…“
==========================
हिंदी चित्रपटसृष्टीत अक्षय कुमारनंतर स्टंटमॅन म्हणून ओळख असणाऱ्या टायगर जॅकी श्रॉफ (Tiger Shroff) याचं खरं नाव हेमंत असं आहे. पण बॉलिवूडमध्ये काम करत असताना कामाप्रमाणेच नाव देखील हटके हवं म्हणून हेमंतचा झाला टायगर श्रॉफ. (Trending news)

असं म्हणतात एकाच नावाच्या दोन व्यक्ती जर का इंडस्ट्रीमध्ये असतील तर बरेच प्रोब्लेम होतात. आता हे कितपत खरं आहे माहित नाही पण या वाक्यांना गंभीरपणे घेत कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने आपल्या आलिया या मुळ नावात बदल करुन कियारा असं नाव स्वीकारलं. (Bollywood gossip)
