
Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे ढकलला?
बॉलिवूडमधला रोमॅंटिक चित्रपटांचा बादशाह शाहरुख खान लवकरच त्याची लेक सुहाना खान हिच्यासोबत किंग चित्रपटात झळकणार आहे… बाप-लेकीचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असून आता या चित्रपटाच्या रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.. काही दिवसांपूर्नी किंग चित्रपटाचं शुटींग करताना शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी आली होती. आता याचं कनेक्शन रिलीज डेटसोबत आहे का जाणून घेऊयात…

तर, शाहरुख खान याने ‘डंकी’ चित्रपटानंतर कोणताही मोठा चित्रपट केला नाही… आता लवकरच तो किंग चित्रपटात दिसाणार होता… परंतु, आता किंग चित्रपटाची रिलीज डेट बदलल्याचं समोर आलं आहे.’ मिड डे’च्या वृत्तानुसार, ‘किंग’च्या शूटमध्ये अनेक व्यत्यय आल्याने चित्रीकरणात दिरंगाई होत आहे. याचं कारण म्हणजे शाहरुख खान जखमी झाला आहे. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत काम करणाऱ्या शाहरुखला पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त त्याने आभार मानणारा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याचं दिसलं. यामुळेच किंग सिनेमाचं शूट संपायला काहीसा उशीर होईल असं म्हटलं जात आहे. आधी हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज होणार होता; मात्र आता २०२७ पर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे…
================================
हे देखील वाचा: Tabu : वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या ‘या’ सुपरस्टारच्या आईची साकारली भूमिका
=================================
शाहरुख खान याचा ‘किंग’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. यात अभिषेक बच्चन, अभय वर्मा, सौरभ शुक्ला, सुहाना खान, जयदीप अहलावत, दीपिका पादूकोण यांच्याही महत्वाच्या भूमिका आहे. जवान चित्रपटानंतर पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिका एकत्र दिसणार असल्यामुळे चाहते विशेष उस्तुक आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi