Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया चांगल आहे पण…’

 ‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया चांगल आहे पण…’
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया चांगल आहे पण…’

by Team KalakrutiMedia 10/11/2025

मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘देवमाणूस‘ फेम किरण गायकवाड(Kiran Gaikwad) याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना धक्का दिला आहे. “देवमाणूस” या मालिकेच्या दोन्ही यशस्वी पर्वानंतर आणि “देवमाणूस: मधला अध्याय” या सीझनमध्ये पुन्हा झळकलेल्या किरणने एक नवा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. किरण गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, त्यासोबतच एक कॅप्शनही लिहिले. या पोस्टमध्ये त्याने सोशल मीडियापासून काही काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. पोस्टमध्ये त्याने स्पष्टपणे सांगितले की, “सोशल मीडिया चांगली आहे, पण योग्य वेळ वापरता आली तर. माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय, असं लक्षात आलं. म्हणून काही काळासाठी (कायमचा नाही) माझ्या ऑफिशियल हँडल्सवरून रजा घेतोय… भेटूया लवकरच. खूप खूप प्रेम.” याच कॅप्शनमध्ये त्याने #socialmediadetox हॅशटॅग वापरला आहे, ज्याचा अर्थ सोशल मीडियाच्या व्यसनापासून ब्रेक घेत आहे, असा दिसून येतो.(Actor Kiran Gaikwad)

Actor Kiran Gaikwad
Devmanus Serial

किरण गायकवाडने सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याचे सांगितले असले तरी, त्याच्या चाहते यावर अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. काही चाहत्यांचा अंदाज आहे की, त्याने हा ब्रेक त्याच्या आगामी सिनेमाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी, त्याने एका मुलाखतीत आपल्या दिग्दर्शन आणि लेखनाच्या पदार्पणाबद्दल खुलासा केला होता. “आता निगेटिव्ह खूप झालं आहे, त्यामुळे म्हटलं आता थांबूयात आपण. मी स्वतःचा सिनेमासुद्धा लिहिला आणि त्याचं दिग्दर्शन सुद्धा झालंय. ‘FIR No 469’ नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केला आहे,” अशी माहिती त्याने दिली होती.

=================================

हे देखील वाचा: Suraj Chavan चं केळवण! बायकोेसाठी घेतला भारी उखाणा एकदा ऐकाचं…

=================================

किरणने यापूर्वी सांगितले होते की, त्याची काही तळमळ आणि खदखद आहे, जी त्याने लेखणीतून कागदावर उतरवली आहे. पुढील वर्षी या सिनेमाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यामागे त्याच्या आगामी सिनेमाच्या पोस्ट-प्रोडक्शन आणि प्रमोशनवर लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश असावा, असं म्हणता येईल.

Actor Kiran Gaikwad

तसेच, ‘देवमाणूस‘ या लोकप्रिय मालिकेने चांगला धुमाकूळ घातला आहे, आणि त्याच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या सोशल मीडियावर परत येण्याची आणि नवीन प्रोजेक्ट्सची माहिती मिळवण्याची इच्छा आहे. अनेक चाहत्यांनी पोस्टच्या कंमेंट्समध्ये किरणला लवकर परत येण्याची विनंती केली आहे, तर काहींना या ब्रेकला फक्त एक प्रकारचा “गंमत” समजले आहे. (Actor Kiran Gaikwad)

=============================

हे देखील वाचा: Last Stop Khanda Movie Trailer: प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा हलकाफुलका, भावनिक आणि मनोरंजक प्रवास!

=============================

सामान्यत: कलाकार त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सोशल मीडियावरून ब्रेक घेत असतात, परंतु किरण गायकवाडच्या बाबतीत याचा प्रभाव त्याच्या आगामी सिनेमा आणि त्याच्या अभिनयासंबंधी असलेल्या योजनेवर होईल, असा अंदाज आहे. किरण गायकवाडच्या या ब्रेक घेतल्याने चाहत्यांच्या मनात शंका निर्माण केली असली तरी, त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल असलेल्या अपेक्षेने यावर अधिक प्रकाश पडला आहे. तो लवकरच परत येणार, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Kiran Gaikwad Celebrity Devmanus serial Entertainment Marathi Serial zee marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.