Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Kiran Mane “मनुवादी बांडगुळांचं कपट….” किरण माने यांची राहुल सोलापूरकरांवर जोरदार टीका
काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या घटनेबाबत एक वक्तव्य केले होते ज्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. राहुल यांनी त्यांच्या विधानात म्हटले होते की, महाराजांनी आग्र्याहून सुटकेसाठी औरंगजेबाच्या अनेक लोकांना आणि त्याच्या पत्नीला लाच दिली होती. या विधानानंतर वाद निर्माण झाला. (Kiran Mane)
त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत जाहीर माफी देखील मागितली. मात्र तरीही हा वाद संपत नाहीये. राहुल सोलापुरकर यांच्या माफी व्हिडिओवर देखील अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच किरण माने (Kiran Mane) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोलापुरकर यांनी माफी मागताना देखील महाराजांचा पुन्हा जाणिवपूर्वक अपमान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Kiran Mane And Rahul Solapurkar)
किरण माने यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, “माझ्या बहुजन शिवभक्तांनो, शिवजयंतीला तुम्ही कुणाचे व्याख्यान आयोजित करत आहात त्याचा मेंदू आणि विचार पुर्ण तपासुन बोलवा. …गेली अनेक दशकं छ. शिवरायांचा जयजयकार करत, त्यांच्याविषयी खोट्या गोष्टी पेरणाऱ्या एका पुणेरी बाजारबुणग्या शिवशाहीराची पिलावळ मनुवाद्यांचा छुपा अजेंडा राबवत आहे. प्रोपोगंडा सिनेमाप्रमाणेच व्याख्यानांमधूनही हे विष पेरलं जातंय !

काल तो सोलापूरकर माफी मागताना जे बोलला ते नीट ऐका म्हणजे या मनुवादी बांडगुळांचं कपट कळेल. माफी मागतानाही या भिकारड्याने “छ. शिवराय हे ‘सामदामदंडभेद’ या चार पद्धतीने मोठे राज्यकर्ते होऊन गेले.” हा निव्वळ खोटा आणि शिवकार्य हीन लेखण्याचा कावा खेळलाय. छ. शिवराय मोठे ठरले ते गोरगरीब, कष्टकरी रयतेची घेतलेली काळजी आणि योजनाबद्ध युद्धनितीमुळे !
https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10232302412850539?ref=embed_post
‘सामदामदंडभेद’ हा निगेटिव्ह शब्दप्रयोग जाणीवपूर्वक खुपसला आहे. ‘राज्यकर्ते सामदामदंडभेद वापरतात’ म्हणजे काय हो??? भ्रष्टाचार करा, बलात्कार करा, खून करा पण माझ्या सत्तेत सामील होऊन माझी खुर्ची बळकट करा… तुमच्यावर कारवाई होणार नाही. खोकीच्या खोकी ओतून पक्ष फोडा पण आमची सत्ता मजबूत करा. जो झुकत नाही त्याला तुरुंगाची भीती दाखवा आणि वाकवा. घराघरात फूट पाडा. याला म्हणतात सामदामदंडभेद. शिवरायांनी राज्यकारभारात ही नीती कधीच वापरली नाही.
…अहो, कट्टर विरोधात असलेल्या सावित्रीबाई उर्फ मल्लम्मा राणीवर हात टाकला म्हणून स्वतःच्या सरदाराला डोळे काढून आयुष्यभर तुरुंगात टाकणारे आणि तिचा जिंकलेला किल्ला तिला परत देणारे राजे होते ते ! सामदामदंडभेदात हे भान नसतं. छ. शिवरायांनी स्वतः नेमलेल्या पाटलानं प्रजेतल्या एका गरीबाच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडले होते. आजकालचे सामदामदंडभेदानं सत्तेत आलेले राज्यकर्ते स्वतः नेमलेल्या मंत्र्यांवर काय कारवाई करतात हो???
========
हे देखील वाचा : Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर
========
राजांचा जयजयकार तर करायचा… त्यांना ‘महान’ तर म्हणायचं पण गुणगान गात-गात शाब्दिक खेळ खेळून त्यांचं कार्य मात्र लहान करायचं हे कपट वर्षानुवर्षे सुरू आहे… कधी अलगदपणे ‘लाच’ शब्द वापरायचा तर कधी ‘सामदाम’… कधी न भेटलेल्या कुणाला थेट गुरु ठरवायचं तर कधी खऱ्या गुरु असलेल्या माता जिजाऊंचा आणि शहाजीराजेंचा मानभंग करायचा… प्रोपगंडा सिनेमांचा एक-एक सिन घेऊन मी त्यातला हा कावा सांगू शकतो. आपल्या सर्व महामानवांबाबत हे केलं जातंय. बहुजनांनो सावध रहा ! जय शिवराय… जय भीम !”
किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. सोबतच राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. किरण माने हे अभिनेते तर आहेत सोबतच त्यांनी राजकारणात प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला देखील सुरुवात केली आहे. ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत.