Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

Kiran Mane किरण माने यांनी पोस्ट शेअर करत दिला ‘त्या’ कटू आठवणींना उजाळा
मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध नाव म्हणजे किरण माने (Kiran Mane). अभिनेते किरण माने हे त्यांच्या लोकप्रिय भूमिकांसोबतच त्यांच्या वादांमुळे देखील खूपच गाजले आणि प्रसिद्ध झाले. मनोरंजनविश्वात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले किरण माने एका वादामुळे मोठ्याप्रमाणावर प्रकाशझोतात आले आणि गाजले. २०२२ साली किरण माने यांना त्यांची मालिका ‘मुलगी झाली हो‘ (Mulgi Zali Ho) मधून काढून टाकण्यात आले. (Kiran Mane)
या मालिकेतून किरण माने काढल्यानंतर किरण माने यांच्यावर सेटवर नीट वागणूक नसल्याने त्यांना काढून टाकले असे सांगितले गेले. मात्र यावर किरण माने यांनी देखील मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर, टीमवर अनेक आरोप केले. सहकलाकारांनी देखील किरण यांचे वागणे योग्य नसल्याचे सांगितले होते. (Latest Marathi News)
हे प्रकरण खूपच गाजले. अगदी राजकीय नेत्यांनी देखील यावर हस्तक्षेप केला. या प्रकरणामुळे किरण माने खूपच प्रसिद्ध झाले आणि त्यांच्या करियरला वेग मिळाला. या सर्व घटनेला या वर्षी तीन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने किरण माने यांनी पुन्हा यावर एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. (Kiran Mane Controversy)
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “बोललो ते करून दाखवलं भावांनो !
…आज बरोब्बर तीन वर्ष झाली ! माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. कुठलीही चूक नसताना मला सिरियलमधून काढून टाकलं होतं. त्यावेळी मी मोठ्या आत्मविश्वासानं ही पोस्ट केली होती.
ट्रोल्सनी थयथयाट केला होता, ‘किरण माने संपला’ , ‘रस्त्यावर आला’, ‘आता त्याला कोण काम देणार?’, ‘आमच्याशी पंगा घेणाऱ्यांना आम्ही असेच संपवू’ अशी गरळ ओकली होती…
त्यावेळी तुम्ही भावाबहिणींनी मला भरभरून सपोर्ट केलावता.
…आज मला तुम्ही ‘सर आँखो पे’ ठेवलं आहे. या तीन वर्षात मी करीयरमधलं सगळ्यात जास्त काम केलं ! तीन सिरियल्स, बिगबॉस, सात सिनेमे… महाराष्ट्रभर शिवशाहू फुले आंबेडकर आणि बुद्धविचारांचा प्रसार… एवढंच नाही तर राजकीय मंचही गाजवला. हे सगळं अजूनही नॉन स्टॉप सुरू आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बिगबॉस मधून आल्यावर साताऱ्यात माझी भव्य मिरवणूक निघाली होती.
आजच्याच दिवशी ज्या वेळी मला सिरीयलमधून काढून टाकल्याचा फोन आला होता, त्याच टायमिंगला म्हणजे बरोब्बर ७.३० वाजता आज माझं फ्लाइट आहे. एका मोठ्या कंपनीच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी मी ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून चाललो आहे ! तीन वर्षांत मी करियरचा आनंदसोहळा साजरा करतोय.
तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतायच… पन त्यावेळी मला विरोध करणारेसुद्धा अनेकजण माझे फॅन झालेत. कौतुकाची, मायेची बरसात करतायत ! परवाच पुण्यातल्या एक लेखिका आशा नेगी भेटल्या… म्हणाल्या, “तीन वर्षांपूर्वी जेव्हा तुमच्यावर आरोप होत होते, तेव्हा माझे तुमच्याविषयी वाईट मत झाले होते. या तीन वर्षातला तुमचा प्रवास पाहून, तुमचे विचार वाचून, भाषणं ऐकून मी तुमची डाय हार्ड फॅन झाले आहे.” माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं…
मला काळजापासून जीव लावणाऱ्या लाखो भावाबहिणींचे लै आभार.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : ‘या” गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!
=============
मी तुमच्या घरातलं एक लेकरू हाय. तुकोबारायांच्या “बोले तैसा चाले” या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करतोय. मराठमोळा अभिनेता म्हनून तुम्हाला कायम अभिमान वाटेल असंच काम माझ्या हातनं होत राहील, हे वचन देतो. लब्यू”
दरम्यान किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळाले. यानंतर हे प्रकरण जेव्हा शांत झाले त्यानंतर किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत त्यांच्या राजकीय करियरला सुरुवात केली. सोशल मीडियावर सक्रिय असलेले किरण माने सतत विविध विषयांवर त्यांचे ठोस मत व्यक्त करताना दिसतात. (Social Media Post)