Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Kiran Mane “अजूनही ती नजर लख्ख आठवते….” किरण मानेंनी सांगितली ‘या’ दिग्गज अभिनेत्याची आठवण
मराठीमधील मराठीतील एव्हरग्रीन आणि प्रतिभावान अभिनेते म्हणजे रमेश भाटकर (Ramesh Bhatkar). रमेशजी यांनी मराठी आणि हिंदीमध्ये अतिशय उत्तम काम केले आहे. रमेशजी यांनी मराठीमध्ये अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. आज जरी रमेशजी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम सर्वांसोबत आहे. अचानक रमेश भाटकर यांचा विषय निघण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर गाजणारी एक पोस्ट. (Kiran Mane)
अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी रमेश भाटकर यांची एक आठवण शेअर केली आहे. किरण माने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. या माध्यमातून ते विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना आणि मतं व्यक्त तर करतात सोबतच ते अनेक आठवणींना उजाळा देतात आणि त्या आठवणी देखील त्यांच्या फॅन्ससोबत शेअर केली. सध्या त्यांनी अभिनेते रमेश भाटकर यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही पोस्ट केली आहे.
किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिले, “ते मराठीतलं दिग्गज नांव होतं… आणि माझा जीवघेण्या धडपडीचा, स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा खडतर काळ होता… मला ते ओळखतही नव्हते……माझी प्रमुख भूमिका, माझं सहलेखन आणि माझं दिग्दर्शन असलेल्या व्यावसायिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होता. नाटकाचं नांव होतं, ‘ती गेली तेव्हा’. एकाचवेळी आठ वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारण्याचं शिवधनुष्य मी पेलत होतो… तिसरी घंटा व्हायला काही क्षण उरले होते. पहिल्या प्रयोगाची धडधड काळजात सुरू होती. पाय थरथरत होते. तेवढ्यात कुणीतरी धावत येऊन सांगितलं, “रमेश भाटकर आलेत नाटक बघायला.”

…पोटात गोळा आला. निर्मात्या लता नार्वेकरांनी पहिल्याच प्रयोगाला का बोलावलं यांना? असा थोडा रागही आला. नाटक थोडं पाॅलीश्ड झाल्यातर आठ दहा प्रयोगांनंतर बोलवायचं ना… असा विचार करत असतानाच तिसरी घंटा झाली. मी स्टेजवर एंट्री घेतली. प्रयोग सुरू झाला. …दोन्ही अंक संपून टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रयोग संपला. प्रयोग संपल्यावर रमेश भाटकर अक्षरश: धावतच मेकअपरूममध्ये आले…(Social News)
लता नार्वेकरांना म्हणाले, “अहो लताबाई, हा किरण माने कुठून शोधलात तुम्ही?? इतके दिवस कुठे होता??? बाप ॲक्टर आहे हा ! बाप !!” असं म्हणत माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला… मी मेकअप काढत होतो. माझ्या कानावर हे पडत होतं. आरशातून लताबाईंशी भरभरुन बोलताना ते मला दिसत होते. नंतर ते मेकअपरूमच्या पलीकडच्या गॅलरीत जाऊन लांब उभे राहिले. मी गॅलरीत आलो. खुप प्रेक्षक आवर्जुन भेटायला आले होते. लोकसत्ताचे जाणकार समीक्षक रविंद्र पाथरे आले होते. त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी आणि लोकसत्तात पानभर लिहीलेल्या समीक्षणानं नंतर माझं विश्व बदलायला सुरूवात झाली. (Entertainment Mix Masala)
https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10232296705507859?ref=embed_post
सगळं संपेपर्यन्त, कितीतरी उशीर एका बाजूला उभं राहुन रमेश भाटकर लांबूनच भारावल्या नजरेनं एकटक माझ्याकडे बघत राहीले होते… अजूनही ती नजर लख्ख आठवतीय मला…त्यानंतर त्यांनी मला भेटून मारलेली मिठी आणि डोळ्यांतलं पाणी मी आयुष्यात विसरणार नाही. …तिथून पुढे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आमच्या खूप भेटीगाठी होत गेल्या. अत्यंत आपुलकीने ते मला भेटत, सध्या सुरू असलेल्या कामांविषयी विचारपूस करत. एका नाॅमिनेशन पार्टीत अवधूत गुप्तेंना “अरे, हा किरण माने. याला घे तुझ्या सिनेमात. (Marathi News)
मी स्टेजवर बघितलंय याला. स्टेजवरचा बाप आहे हा !” असं सांगीतलं त्यांनी… त्या बोलण्याचा ‘इम्पॅक्ट’ असा होता की, अवधूत गुप्तेंनी तिथल्या तिथं माझं कास्टिंग केलं ! कुठल्याही ऑडीशन आणि लूकटेस्टशिवाय ‘कान्हा’ मध्ये इन्स्पेक्टरचा एक महत्त्वपूर्ण रोल दिला !! मला ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्री’चा ‘पिलर ऑफ हिंन्दूस्तानी सोसायटी’ हा पुरस्कार मिळाला तेव्हा प्रेक्षकांमधून जोरदार खणखणीत आवाजात “बाप ॲक्टर आहे हाSSS” असं ओरडलेले भाटकर आठवले की अजून डोळे पाणावतात माझे…
==============
हे देखील वाचा: Hemant Dhome: तू Superstar आहेस आणि कायम राहणार! हेमंत ढोमेने केले ‘या’ अभिनेत्याचे भरभरून कौतुक
Gurucharan Singh कर्जात बुडालेल्या ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंगला कामाची गरज
==============
…रमेशसर, तुमच्यासारखा दिलदार आणि मनमोकळा माणूस मी आजवर मराठी इंडस्ट्रीत पाहिला नाही. तुम्ही आत्ता जिथे कुठे असाल तिथे मस्त, दिलखुलास गप्पांची मैफिल रंगवली असणार. रमेश भाटकर नांवाच्या एका रूबाबदार आणि तितक्याच सहृदय कलावंताला जाऊन नुकतीच पाच वर्ष झाली.. ‘माणूस’ म्हणून ‘बाप’ असलेल्या कलावंताला कडकडीत सलाम !”