Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आषाढीच्या निमित्ताने किरण मानेंची खास पोस्ट

 आषाढीच्या निमित्ताने किरण मानेंची खास पोस्ट
टीव्ही वाले

आषाढीच्या निमित्ताने किरण मानेंची खास पोस्ट

by Jyotsna Kulkarni 18/07/2024

आज आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे आज दर्शन घेऊन वारकरी मंडळी आपला दिवस सार्थकी लावतात. आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. आज सगळे उपवास करत पांडुरंगाच्या स्मरणात आपला दिवस घालवतात. संतांची भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्राला अनेक मोठमोठे संत लाभले.

प्रत्येक संतांचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल. याच विठ्ठलामध्ये सगळ्यांनी आपला आपला देव पाहिला. तुकारामांनी देखील विठ्ठलामध्ये बुद्धांना पाहिले होते. याच संदर्भातली एक पोस्ट अभिनेते किरण माने यांनी केली आहे. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते असलेल्या किरण माने यांनी आषाढीच्या निमित्ताने तुकोबांच्या अभंगांवर आधारित एक वेगळी पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी तुकोबारायांनी त्यांच्या अभांगामध्ये कशा विविध भाषांचा वापर करत विठ्ठलामध्ये त्यांना कोणते देव दिसायचे ते सांगितले आहे.

…आपला तुकोबाराया विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला बघत होता हे "बौद्ध्य अवतार माझीया अदृष्टा" सारख्या अभंगामधनं कळतं… गाथेतल्या कित्येक अभंगांत बुद्धविचार सापडतो. तसंच, काही अभंगांमधनं हे ही कळतं की, तुकोबाराया 'अल्ला आणि इठूराया'ला वेगळं मानत नव्हता ! पण काय गंमतय बघा की..… pic.twitter.com/n4RzL0W3xk

— Kiran Mane (@kiranmane7777) July 17, 2024

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “…आपला तुकोबाराया विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला बघत होता हे “बौद्ध्य अवतार माझीया अदृष्टा” सारख्या अभंगामधनं कळतं… गाथेतल्या कित्येक अभंगांत बुद्धविचार सापडतो. तसंच, काही अभंगांमधनं हे ही कळतं की, तुकोबाराया ‘अल्ला आणि इठूराया’ला वेगळं मानत नव्हता ! पण काय गंमतय बघा की.. विठ्ठल-बुद्ध आणि अल्ला यांना मानणार्‍यांमध्ये मात्र आपल्याला फूट पडलेली दिसते. भिंतीच उभ्या र्‍हायल्यात माणसामाणसात. का होत असेल असं?

मी बर्‍याचदा तुकोबारायाचे अल्लावरचे अभंग काढून समजून घेत बसतो. उर्दू,फारसी आणि मराठी शब्दांनी सजवलेल्या त्या अभंगाचा अर्थ लावणं, हे खायचं काम नाय भावांनो… पण तो लागला आणि मेंदूत मुरला तर या भेदाभेदाच्या भिंती धडाधडा कोसळतात.

तुकोबांनी लिहीलेल्या “आवल्ल नाम आल्ला बडा लेते भूल न जाये” …या अभंगाचा आशय खोलात जाऊन अभ्यासताना मला एक लै इंटरेस्टिंग गोष्ट सापडली !

त्या अभंगाच्या शेवटी तुकोबाराया म्हन्तो “एक तीर नहीं प्यार जीतनकी आस । कहे तुका सो हि मुंडा राखलिये पायेनपास ।।”
याचा अर्थ असा की…”पैलतीर गाठणं अर्थात मुक्ती-मोक्ष वगैरे मिळवणं हा माझा उद्देश नाही, तर मला फक्त प्रेम जिंकण्याची आस आहे. त्यामुळे ‘मुंडां’नी मला त्यांच्या पायाशी रहाण्याचा आनंद घेऊ द्यावा.”

…’मुंडा’ म्हणजे काय? तुकोबाराया एवढं आदरानं नांव घेतात म्हणजे काहीतरी वेगळं असनार. हिंदी सिनेमात प्रेयसी प्रियकराला ‘मुंडा’ म्हन्ताना लै वेळा ऐकलंय आपण. पण या शब्दाचा खरा मूळ अर्थ मला तळाशीकर गुरूजींच्या ग्रंथात सापडला. तिथं लिहीलंय ‘मुंडा’ म्हन्जे ‘मुस्लीम संतांचा एक प्रकार’. तुकोबारायांच्या काळात तर मुस्लीम सूफ़ी संतांचा हिंदू-मुस्लिम जनतेवर लै पगडा होता. म्हणजे तुकोबारायांनी त्या ओळीत ‘सूफ़ी संतांच्या पायाशी रहाण्याचा आनंद’ मागीतलाय ! सूफ़ींचं अल्लाला साद घालणं, हे हिंदूंच्या देवाला आळवण्याच्या पद्धतीशी मॅच होनारं आहे. हाच अभंग मी पुन्हा त्या अंगानं वाचल्यावर लक्षात आलं, तुकोबारायाचा हा अभंग म्हणजे एक ‘सूफ़ी’ भक्तीगीतच आहे… जे मुस्लीम संत आनि फकीर गातात !

…आणखी एक गंमत सांगतो.. ‘सूफ़ी’ हा इस्लाममधला असा संप्रदाय आहे, जो आचारविचारांनी आपल्या ‘वारकरी संप्रदाया’शी मिळताजुळता आहे ! सूफ़ी हा सुद्धा वारकर्‍यांसारखा एकेश्वरवादी संप्रदाय हाय, जो धार्मिक कट्टरतेपास्नं लांब आहे. कर्मकांड मानत नाही. प्रेम आणि नामस्मरण हीच ईश्वरापर्यन्त पोहोचण्याची खरी वाट आहे, असं या ही संप्रदायाचं मानणं आहे. वारकरी संप्रदायासारखाच सूफ़ी संप्रदायही सर्वधर्मसमभाव, मानवता, उदारमतवाद यासाठी प्रसिद्ध आहे.

असंच नातं बौद्ध धम्मातल्या ‘चारिका’ आणि आपली वारकर्‍यांची ‘दिंडी’ या दोन्हीत सापडतं ! बौद्ध भिक्खू पायी चालत निघतात. ठिकठिकाणी लोक स्वखुशीनं,स्वखर्चानं त्यांच्या जेवणा-रहाण्याची सोय करतात. दिंडीतबी वारकर्‍यांना जेवण देणं, त्यांची सेवा करणं हे सन्मानाचं समजलं जातं. थोडाफार फरक असला तरी दोन्हीचं मूळ उद्दिष्ट हे ‘समता-बंधुता’ रूजवणं हेच आहे !

हिंदू-मुस्लीम-बौद्ध एकतेची नाळ किती जुनी आहे बघा भावांनो. असंच आपल्याला इतरही धर्मांबाबतीत सापडतं. बुद्ध, बसवण्णा, महावीर, मोइनुद्दीन चिश्ती, नामदेव, गुरूनानक, कबीर, तुकाराम…अशा सगळ्यांचं एकमेकांशी घट्ट वैचारीक नातं आहे.. पण आज यांचे अनुयायी मात्र एकमेकांना पाण्यात बघतात. म्हणजे, आपणच या महामानवांच्या विचारांना नीट समजून घेण्यात कुठंतरी कमी पडतो.

==============================

हे देखील वाचा: प्राइम व्हिडिओवर भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली शो सिरीज ठरली ‘मिर्झापूर 3’

==============================

आज आषाढी एकादशी ! आजच्या दिवशी संतांच्या समतेच्या, मानवतेच्या विचारांची राखण करायचा संकल्प करूया आणि भेदभावाला, उच्चनीचतेला नष्ट करूया…
ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल.”

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांचा मुद्दा पटला असल्याचे सांगितले तर काहींनी त्यांना नाण्याच्या दोन्ही बाजू मांडण्याची विनंती देखील केली आहे. किरण माने हे मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारत प्रसिद्धी मिळवली. शिवाय ते बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actor kiran mane kiran mane ashadhi post kiran mane special post किरण माने किरण माने पोस्ट
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.