
Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!
भारतीय सिनेमाच्या संगीताचा जेव्हा सुवर्णकाळ चालू होता त्यावेळी अभिनेता देव आनंद सोडला तर इतर कुणी किशोर कुमार यांचा स्वर पार्श्वगायनासाठी वापरत नसत. देव आनंदसाठी किशोर कुमार हे कॉम्बिनेशन मात्र त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. त्या काळातील आघाडीचे इतर सर्व अभिनेते एक तर महंमद रफी किंवा मुकेश यांचा स्वर स्वतःसाठी वापरत असे. क्वचित प्रसंगी हेमंत कुमार आणि मन्ना डे यांचा देखील स्वर हिंदी सिनेमा दिसायचा. तलतचा स्वर हा सुध्दा रेअर चॉईस होता. किशोर कुमार मात्र त्या काळामध्ये Dev Anand वगळता इतरांसाठी पार्श्वगायन करताना फारसे दिसले नाहीत. (Manoj kumar)

त्या काळात म्हणजे पन्नास आणि साठच्या दशकात किशोर कुमार चित्रपटात अभिनय देखील करत असल्यामुळे स्वतःसाठी गाणे आणि देवानंद करिता प्लेबॅक देणे हेच चित्र होतं. १९६९ साली राजेश खन्ना यांचा आराधना चित्रपट प्रदर्शित झाला आणि तिथून मात्र किशोरचा जबरदस्त हंगामा सुरु झाला. त्यानंतर मात्र जळी/ स्थळी/ काष्टी/ पाषाणी किशोर कुमार दिसू लागला. ज्या संगीतकारांनी(नौशाद) आणि ज्या अभिनेत्यांनी (राजेंद्र कुमार) किशोर कुमार यांचा स्वर आयुष्यभर टाळला त्यांना झक्कत किशोर कुमार याचा स्वर घ्यावा लागला! (Bollywood mix masala)
आपण एकूणच Kishore Kumar च्या कारकिर्दीकडे बघितलं तर राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि देव आनंद यांचा अपवाद वगळला तर किशोर कुमार फारसा कुणा अभिनेत्यासोबत त्याची जोडी जमू शकली नाही हे निश्चित. काही काही अभिनेत्यांसाठी तर अगदीच एखाद दुसरं गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं. आज आपण आघाडीच्या कलावंतांचं किशोर कुमार सोबत असोसिएशन पाहूया. राज कपूर कायम मुकेश यांचा स्वर वापरायचे. क्वचित प्रसंगी मन्ना डे आणि रफी यांचा देखील स्वर राज कपूर यांनी वापरला.

किशोर कुमार आणि राज कपूर हे कॉम्बिनेशन फारसं कधी आलंच नाही. अगदी सुरुवातीला १९५० साली सचिन देव बर्मन यांनी ‘प्यार’ या चित्रपटासाठी राज कपूर करिता किशोर कुमारचा प्लेबॅक म्हणून वापर केला. या चित्रपटात चार गाणी होती. दुर्दैवाने हा चित्रपट आणि ही गाणी फारशी चालली नाही. त्यामुळे कदाचित राज कपूर यांनी पुन्हा कधीच किशोर कुमार यांचा स्वर वापरला नसावा. राज कपूर यांचे पुत्र रणधीर कपूर यांनी १९७१ साली ‘कल आज और कल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात मात्र त्यांनी स्वतःसाठी किशोर कुमार यांचा स्वर घेतला! या चित्रपटातील ‘भंवरे की गुंजन है मेरा दिल…’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगला स्वतः राज कपूर उपस्थित होते आणि त्यांनी किशोर कुमारला या गाण्यामध्ये त्याच्या सुप्रसिद्ध yodelling चा उपयोग कर असं सांगितलं होतं! आर के च्या नंतरच्या काही चित्रपटांमध्ये किशोर कुमारचा स्वर ऐकायला मिळाला.(धरम करम, बीवी ओ बीवी) (Manoj kumar)
दिलीप कुमार आणि किशोर कुमार हे कॉम्बिनेशन सत्तरच्या दशकामध्ये पाहायला मिळाले. ‘सगीना’ या चित्रपटात किशोर कुमारने दिलीप कुमारसाठी पार्श्वगायन केले होते. त्यावेळेला या दोघांची चांगली मैत्री देखील झाली होती. ‘साला मै साहब बन गया…’ या गाण्याच्या रेकॉर्डिंग करून दोघे चक्क क्रिकेट देखील खेळले होते. ‘सगीना’ या चित्रपटात किशोर कुमारची चार गाणी होते.
=============
हे देखील वाचा : ‘डॉन’ चित्रपटाच्या निर्मिती मागे मनोज कुमार यांचे कनेक्शन
=============
गोल्डन इरा मधील आणखी एक कलावंत म्हणजे राजेंद्र कुमार. ‘आप आये बहार आई’ या चित्रपटात राजेंद्र कुमारवर चित्रित एका गाण्यात किशोर कुमारचा स्वर आहे ‘तुमको भी कुछ ऐसा ही कुछ होता होगा हो सजना…’ हे एकमेव गाणे आहे ज्यात हे दोन कलावंत एकत्र आले होते. यानंतर ‘सुनहरा संसार’ या चित्रपट खरंतर एक युगलगीतामध्ये किशोर आशा यांचा स्वर होता. जे गाणे राजेंद्र कुमार यांच्यावर चित्रित होणार आहे पण काही कारणाने हे गाणे चित्रपटात घेतले गेले नाही. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाला संगीत नौशाद यांचे होते. नौशाद आणि किशोर कुमार यांनी कधीच एकत्र काम केले नव्हते हे त्या दोघांचे एकमेव गाणे होते. पण दुर्दैवाने त्याचा चित्रपटात समावेश झाला नाही. (Manoj kumar)
मनोज कुमार (Manoj kumar) आणि किशोर कुमार हे देखील उभ्या आयुष्यात कधीच एकत्र आले नाही. मनोज कुमारवर चित्रीत एकाही गाण्यांमध्ये किशोर कुमारचा स्वर नाही. ‘क्रांती’ या चित्रपटात त्यांनी किशोर कुमारचा स्वर वापरला पण शत्रुघ्न सिन्हासाठी. (चना जोर गरम) नाही म्हणायला या दोघांचा एक गाणं आहे पण ते गाणं मनोज कुमारची करीत नाही. तर त्या गाण्याचे गीतकार स्वतः मनोज कुमार आहे.

मनोज कुमार यांनी आपल्या भावासाठी १९८२ साली ‘पेंटर बाबू’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातील ‘पेंटर बाबू आय लव यू…’ हे गाणं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलं होतं चित्रपटात हे गाणं राजीव गोस्वामी आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर चित्रीत झालं होतं. हे गाणं अभिनेता मनोज कुमार (Manoj kumar) यांनी लिहिलं होतं हाच काय या दोघांचा एकत्रित संबंध! मनोज कुमारचा मुलगा कुणाल गोस्वामी ‘कलाकार’ या सिनेमातून हिंदी सिनेमात आला. यातील त्याच्यावर चित्रित ‘नीले नीले अंबर पर चांद जब आये….’ हे किशोरने गायलेलं गाणं मात्र अफाट लोकप्रिय ठरलं होतं.