किशोर कुमार यांनी संगीतकारासोबत भांडून अनुपमा देशपांडे सोबत गाणे गायले!
किशोर कुमार यांनी संगीतकारासोबत भांडून अनुपमा देशपांडे सोबत गाणे गायले!
हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात नवीन कलावंताला फार मोठा संघर्ष करावा लागतो. एक तर त्याला वारंवार स्वतःला सिद्ध करावे लागते. एवढं करूनही पुढे त्याला काम मिळेल, यश मिळेल याची खात्री नसते. पण बऱ्याचदा सुखद असा अनुभव मिळतो. गायक कलाकार Kishore Kumar (Kishore Kumar) यांनी ऐंशीच्या दशकातील एका गायिकेला आपल्यासोबत गायची संधी देवून तिच्या करिअरला आकार देण्याचा प्रयत्न केला. (Ankahi Baatein)
या वेळी Kishore Kumar (Kishore Kumar) यांनी दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्याशी वाद घालून ते गाणं त्या गायिकेला गायला दिलं त्यामुळे गायिका आयुष्यभर किशोर कुमार यांचे उपकार मानत राहीली. कोण होती ती गायिका? आणि कोणत्या गाण्याबाबत झाला होता हा किस्सा? ही घटना ऐंशीच्या दशकातील एक पार्श्वगायिका Anupama Deshpande यांच्या बाबतची आहे. १९८३ साली एकदा किशोर कुमार Mahesh Bhatt यांच्या एका चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी बघितले की पार्श्वगायिका Anupama Deshpande तिथे त्यांची वाट पाहत आहे. किशोर कुमार आल्यानंतर अनुपमाने वाकून किशोरदा यांना नमस्कार केला.
किशोरदा म्हणाले, ”अरे वा, आज अनुपमा आप मेरे साथ गाना गाने वाली है क्या? मजा आयेगा.” त्यावर Anupama Deshpande म्हणाली, ”हां किशोर दादा लेकिन ये गाना… मेरा सिर्फ डबिंग गाना होगा. बाद में ये गाना कोई और सिंगर गाने वाली है.” हे ऐकून किशोर कुमार यांना खूप विचित्र आणि वाईट वाटले. याचे कारण नुकत्याच झालेल्या १९८३ सालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून Kishore Kumar (Kishore Kumar) यांना पुरस्कार मिळाला होता तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून Anupama Deshpande यांना पुरस्कार मिळाला होता.
Kishore Kumar (Kishore Kumar) यांना ‘शराबी’ च्या ‘मंजिले अपनी जगह है’ या गाण्यासाठी तर Anupama Deshpande यांना ‘सोहनी महिवाल’ या चित्रपटातील ‘सोनी चनाब दे किनारे‘ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायकीचा पुरस्कार मिळाला होता. एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर देखील जर संगीतकार आणि दिग्दर्शक Anupama Deshpande यांना डबिंग आर्टिस्ट म्हणून तर ट्रीट करत असतील तर ते चुकीचं आहे असं त्यांना वाटलं.
ते म्हणाले,”तू या डबिंगला होकार कसा दिला?” त्यावर ती म्हणाली, ”माझे करिअर अजून सुरू व्हायचे आहे मला या गोष्टी कराव्या लागतात.” त्यावर किशोर कुमार (Kishore Kumar) म्हणाले, ”पण हे बरोबर नाही. आता तुझं पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये नाव झालं आहे. आणि त्याला फिल्मफेअर पुरस्काराच्या रूपाने एक कन्फर्मेशन देखील मिळालेलं आहे. असं असताना तू आता पहिल्यासारखे डबिंग म्हणून काम करणं मला योग्य वाटत नाही. मी आत्ता संगीतकाराला बोलून या गोष्टी सांगतो.” त्यावर Anupama Deshpande म्हणाली, ”नही किशोरदा, प्लीज ऐसा मत कीजिए. नही तो मुझे डबिंग के लिए भी नही बुलायेंगे.” या वाक्याने तर किशोर कुमार यांना जास्तच राग आला.
त्यांनी ताबडतोब संगीतकार Rajesh Roshan आणि दिग्दर्शक महेश भट यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितलं की, ”तुम्हाला माहिती आहे काही महिन्यापूर्वी Anupama Deshpande यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. असं असताना अजूनही तुम्ही त्यांना आता डबिंग आर्टिस्ट म्हणून का ट्रीट करतात हा त्यांचा अपमान नाही का?” त्यावर संगीतकार Rajesh Roshan गप्प बसले. पण महेश भट म्हणाले, ”किशोरदा तुम्हे मालूम है आपके साथ कौन गानेवाली है?” किशोर कुमार यांनी त्यांचे वाक्य तोडत म्हणाले,” मला ते ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही की माझ्यासोबत कोणती गायिका गाणार आहे. माझ्यासोबत जर Anupama Deshpande गाणार असेल तरच मी गाईन आणि मला विश्वास आहे Anupama Deshpande माझ्यासोबत गाण्यासाठी सक्षम आहे. अनुपमा जर माझ्यासोबत गाणार असेल तरच मी हे गाणे रेकॉर्ड करेल नाहीतर मी चाललो.” असं म्हटल्यानंतर मात्र महेश भट आणि संगीतकार राजेश रोशन चपापाले.
महेश भट म्हणाले ,”नही दादा.. ऐसा मत करो. ये गाना अनुपमा ही आपके साथ गायेगी.” आणि ते गाणं रेकॉर्ड झालं. हे गाणं होतं ‘काश’ या चित्रपटातील. गाण्याचे बोल होते ‘ओ यारा तू प्यारो से है प्यारा…’ हे गाणं इतकं सुंदर झालं की Mahesh Bhatt यांनी लगेच आपल्या आगामी चित्रपटातील एक गाणं देखील Kishore Kumar (Kishore Kumar) आणि Anupama Deshpande यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं.
=============
हे देखील वाचा : ‘क्रांतीवीर’ चा ‘तो’ आयकॉनिक डायलॉग नानांनी स्वत:च लिहिला होता!
=============
हा चित्रपट होता कब्जा आणि गाण्याचे बोल होते ‘तुमसे मिले बिन चैन नाही आता मै क्या करू…’ Kishore Kumar (Kishore Kumar) यांनी रेकॉर्डिंग Mahesh Bhatt आणि Rajesh Roshan यांना पुन्हा एकदा खडसावून सांगितले,” जर तुम्ही हे गाणं दुसऱ्या गायिकेच्या आवाजात रेकॉर्ड करणार केलं तर हे आपलं शेवटचं गाणं आहे असं समजा!” निर्माता दिग्दर्शक महेश भट Mahesh Bhatt आणि Rajesh Roshan यांनी असा काही प्रकार केला नाही हे गाणं अनुपमा देशपांडेच्या आवाजातच कायम राहीलं. हा किस्सा स्वतः Rajesh Roshan यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. (Ankahi Baatein)