मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
किशोर कुमार स्वत: प्रचंड मोठा फॅन होता या हॉलीवुड मूव्हीचा!
अभिनय, पार्श्वगायन, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला हरफन मौला कलाकार म्हणजे किशोर कुमार(Kishore Kumar)! त्याने रुपेरी पडद्यावर आपल्या आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केली. आज किशोर कुमार यांना आपल्यातून जाऊन जवळपास ३५-४० वर्षे झाली तरीही त्यांचे करोडो फॅन्स आज देखील त्यांची गाणी अगदी नित्यनेमाने ऐकत असतात. आज देशातील कुठलाही संगीतमय कार्यक्रम किशोर कुमारच्या गाण्याशिवाय अधुरा असतो! इतकं जबरदस्त काम किशोर कुमार यांनी करून ठेवलं आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का? किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी एक हॉलीवूडचा सिनेमा तब्बल १०० वेळा बघितला होता. त्यांना हा सिनेमा इतका आवडला होता की नंतर त्यांनी या सिनेमाच्या टेप्स अमेरिकेतून मागवल्या होत्या आणि आपल्या घरातील १६ एमएमच्या प्रोजेक्टरवर लावून हा सिनेमा ते केव्हाही कधीही आणि कुठून ही पुन्हा पुन्हा पाहत असे! किशोर कुमार (Kishore Kumar) यांचे पुत्र अमित कुमार यांनी ही दिलचस्प आठवण एका कार्यक्रमात सांगितली होती. कोणता होता हा चित्रपट? आणि किशोर कुमार यांना का आवडत होता हा चित्रपट? हा चित्रपट होता ‘फिडलर ऑन द रूफ’ हा १९७१ साली प्रदर्शित झालेला हॉलीवूडचा चित्रपट.
या पिरीयड मूव्हीमध्ये काय नव्हते? ॲक्शन होती. इमोशन होती. ड्रामा होता. कॉमेडी होती आणि म्युझिक होते. सबकुछ मसाला मूवी असलेला हा सिनेमा किशोर कुमारला प्रचंड आवडत असे. त्यामुळे अक्षरशः शंभर वेळेला हा चित्रपट किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी बघितला. किशोर कुमार या चित्रपटाचे नायक Chaim Topol याचे जबरदस्त फॅन होते. त्यांची इच्छा होती या कलाकाराला आयुष्यात एकदा तरी भेटायचे आणि ही त्यांची इच्छा पूर्ण देखील झाली.
१९८३ साली जेव्हा किशोर कुमार (Kishore Kumar) लंडनला एका म्युझिकल कॉन्सर्टला गेले असताना तिथे त्यांनी हॉटेलमध्ये वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली त्यामध्ये त्यांना ‘फिडलर ऑन द रूफ’ नाटकाची जाहिरात दिसली. किशोर कुमार प्रचंड खुश झाले. त्यांनी ती जाहिरात वाचल्यानंतर त्यांना आणखी आनंद झाला की ही जाहिरात त्या चित्रपटाचे नाटकिय रूपांतर रंगमंचावर सादर करण्याची होती आणि सर्वात सुखद धक्का म्हणजे यातील प्रमुख भूमिका टोपोल हेच करणार होते. ‘किशोर कुमार त्या रात्री अक्षरश: झोपू शकले नाहीत’ असे अमित कुमार यांनी सांगितले. रात्रभर ते विचार करत होते उद्या मी प्रत्यक्ष टोपोल यांना बघणार आहे. त्यांना भेटणार आहे.
दुसऱ्या दिवशी थिएटरमध्ये जाऊन त्यांनी या नाटकाचा शो पाहिला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी सलग चार शो त्या नाटकाचे पुढचे काही दिवस बघितले. बॅक स्टेजला जाऊन ते टोपोल यांना भेटले आणि मागच्या दहा-बारा वर्षांपासून आपण हा सिनेमा कसा पहात आहोत हे सांगितले. टोपोल यांना देखील खूप आनंद झाला. किशोर कुमार यांनी आपल्या काही कॅसेटसोबत घेतल्या होत्या त्या टोपोला सप्रेम भेट दिल्या. टोपोल यांनी देखील त्यांचे आत्मचरित्र टोपोल बाय टोपोल किशोर कुमार यांना स्वतःची सही करून भेट दिले. किशोर कुमार यांनी हे पुस्तक मिळाल्या मिळाल्या वाचायला सुरुवात केली. किशोर कुमारसाठी आपल्या अतिशय लाडक्या अभिनेत्याची भेट, त्याचे आत्मचरित्र पुस्तक हा चित्रपट म्हणजे सुखाची परमावधी होता!
========
हे देखील वाचा : सस्पेन्स म्युझिकल हिट ‘बीस साल बाद’ आठवतो का?
========
किशोर कुमारचे करोडो फॅन्स आज देखील आहेत पण किशोर कुमार (Kishore Kumar) मात्र दिवाने होते फेड्लर ऑन द रूफ या कलाकृतीचे चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर या देखील या चित्रपटाच्या जबरदस्त फॅन आहेत. ‘मान्सून वेडिंग’ हा चित्रपट दिग्दर्शित करताना त्यांच्या डोक्यात कुठेतरी ‘फिडलर ऑन द रूफ’ चित्रपट होताच.