Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

किशोर कुमार घरात ठेवायचे खरी खोपडी आणि हाडं? मुलगा अमितने सांगितलं खरं कारण, म्हणाले लोक त्यांना ‘वेडे’ म्हणायचे !
कितीही दशके किंवा युगे उलटली, तरी किशोर कुमार हे नाव भारतीय संगीतविश्वात अजरामर राहील. अनेक पिढ्यांना त्यांच्या गाण्यांमध्ये आणि त्यांच्या संगीतवारशात समाधान आणि आनंद सापडतो. त्यांच्या अफाट यशस्वी गायन कारकिर्दीबद्दल बहुतेकांना माहिती आहे, परंतु त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांची विनोदबुद्धी आणि अनोखे छंद याविषयी अजूनही अनेक रहस्ये आहेत. अलीकडेच किशोर कुमार यांचे पुत्र, अमित कुमार यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांविषयी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आणि काही गाजलेले गैरसमज दूर केले. त्यांनी काही अशा किस्स्यांची सांगड घातली जी किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळाच पैलू उघड करतात.(Kishor Kumar Hobby)

गेल्या काही वर्षांत किशोर कुमार यांच्याबद्दल सर्वात जास्त पसरलेली अफवा म्हणजे – ते आपल्या घरात खोपड्या आणि हाडं ठेवत असत, जेणेकरून त्यांना न आवडणारे लोक दूर राहावेत. मात्र अमित कुमार यांनी याबाबत सत्य सांगितले आहे. अमित म्हणाले, “ही खोपड्या आणि हाडं आम्ही पूर्व आफ्रिकेतील नैरोबी येथून आणली होती. तिथे शोसाठी गेलो होतो आणि बाबांना अशा कलाकृती गोळा करण्याची फार आवड होती. ते सर्व अजूनही आमच्या ट्रस्टमध्ये सुरक्षित आहेत.” खरतर , किशोर कुमार यांना आफ्रिकन संगीत, बीड्स (मोती), आणि कला यांच्याबद्दल विशेष आकर्षण होते. अमित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, “त्यांना आफ्रिकन संगीत खूप आवडायचं. ते स्वतःवर विनोद करण्यास मागे पुढे बघत नसत. ते म्हणायचे – ‘लोक मला वेडा म्हणतात? मी म्हणतो, ही दुनिया वेडी आहे… होऊ दे, बरंय ना!’”

‘आप की अदालत’ फेम रजत शर्मा यांनी देखील किशोर कुमार यांच्या घराचा एक विस्मयजनक अनुभव शेअर केला होता. त्यांनी सांगितले की, एका वेळेस जेव्हा ते किशोर कुमार यांच्या घरात गेले, तेव्हा एका लांब कॉरिडोरमध्ये भितीदायक वातावरण होतं आणि आजूबाजूला कुत्रे होते. ड्रॉइंग रूममध्ये चारही बाजूंना खोपड्या आणि हाडं होती – त्यामध्ये लाइट्स देखील लावलेल्या होत्या. जेव्हा रजत शर्मा यांनी विचारलं की, “या खोपड्या इथे का आहेत?” तेव्हा किशोर कुमार यांनी मिश्किल उत्तर दिलं – “एक दिवस तुझीही खोपडी इथे लावेन आणि त्यात दिवा पेटवेन!” (Kishor Kumar Hobby)
==============================
==============================
१३ ऑक्टोबर १९८७ रोजी किशोर कुमार यांचे निधन झाले, पण त्यांच्या आठवणी आणि गाणी आजही प्रत्येक पिढीत जीवंत आहेत. त्यांच्या जीवनातील हे किस्से आपल्याला हेच सांगतात की ते केवळ महान गायक नव्हते, तर एक विनोदी, विचित्र पण हसतमुख माणूस होते – ज्यांनी आपलं जीवन पूर्णपणे त्यांच्या शैलीने जगलं.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News