किशोर कुमारने हे गाणे चक्क झोपून रेकॉर्ड केले होते!
Rajesh Khanna आणि Amitabh Bacchan या दोन सुपरस्टार्सला गाण्यासाठी आपला आवाज देऊन त्यांचं पद आणखी उंचावणारा कलाकार म्हणजे Kishore Kumar! (Kishore Kumar) सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये Kishore Kumar प्रचंड लोकप्रिय होते. खरंतर गोल्डन इरा मध्ये Kishore Kumarच्या स्वराकडे त्याकाळच्या टॉपच्या संगीतकारांनी फारसं लक्ष दिले नाही. अपवाद फक्त सचिन देव बर्मन यांचा. पण सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मात्र Kishore Kumar ने आपला आधीचा संपूर्ण बॅकलॉग भरून काढला आणि तो देखील अतिशय दर्जेदार आणि मेलडीअस गाणी गाऊन.
Kishore Kumar यांच्या बाबतच्या अनेक कथा आणि दंतकथा आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असतात. त्यांचे अनेक किस्से आजदेखील मोठ्या चवीने ऐकले जातात. यातीलच एक किस्सा. जो मात्र शंभर टक्के खरा आहे. कारण या गाण्याचे संगीतकार Bappi Lahiri यांनी स्वत:च हा किस्सा सांगितला आहे. ऐंशीच्या दशकातील एका लोकप्रिय गाण्याच्या मेकिंगचा हा किस्सा आहे. हाच किस्सा तो Kishore Kumar (Kishore Kumar) यांचे पुत्र अमित कुमार यांनी आकाशवाणीवरील एका मुलाखतीत सांगितला देखील होता. (Untold Stories)
हा किस्सा आहे १९८३ सालचा. त्यावेळी Amitabh Bacchan प्रकाश मेहरा यांच्या एका चित्रपटात काम करत होते चित्रपटाचं नाव होतं ‘शराबी’. प्रकाश मेहरा आणि Amitabh Bacchan यांचा हा सहावा चित्रपट होता. या चित्रपटाला संगीत होतं Bappi Lahiri यांचं होतं तर गाणी अंजान यांनी लिहिली होती. या चित्रपटात Amitabh Bacchan, जयाप्रदा, प्राण, ओमप्रकाश यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यातील Amitabh Bacchan यांचे कॅरेक्टर शराबीचे होते. एका श्रीमंत बापाचा मुलगा अशी त्याची भूमिका होती. संपूर्ण सिनेमात तो शराबी दाखवला होता. या चित्रपटातील एका गाण्याचा हा किस्सा आहे.
हे गाणे Kishore Kumar आणि आशा भोसले गाणार होते. Bappi Lahiri यांनी Kishore Kumar यांना गाण्याची सिच्युएशन समजून सांगितली. यातील नायक आपल्या नायिकेची आतुरतेने वाट पाहत आहे त्याने भरपूर मद्यप्राशन केले आहे आणि याच अवस्थेत तो हे गाणे गातो. Kishore Kumar (Kishore Kumar) यांनी बप्पी लहरीला विचारले, ”अरे भांजे, तुला माहित आहे मी दारू पीत नाही. फिर ये गाना तू मुझसे क्यू गवाना चाहते हो? दुसऱ्या कोणाकडून गाऊन का घेत नाहीस?” त्यावर Bappi Lahiri म्हणाले,”मामा , मुझे मालूम है. लेकीन ये गाना आप ही का है और ये गाना मैने आपके लिये हि बनाया है” Kishore Kumar आता गाणं गायला राजी झाला. (Untold Stories)
पण Kishore Kumar (Kishore Kumar)ने थोडी गंमत करायचे ठरवले त्याने सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना सांगितलं की यातील नायिका मोठ्ठा जिना उतरत उतरत गात येते तुम्ही तसे या म्हणजे मला गाण्याचा फील येईल. सगळेजण हसू लागले! नंतर आशा भोसले म्हणाली, ”त्यांना कशाला मीच येते ना!” मग आशा भोसले गाण्याच्या वेळेला जिना खाली उतरत उतरत आली. Kishore Kumar ला वाटले आणखी गंमत करावी. तो म्हणाला,”दारू पिल्यानंतर कुणीही माणूस धड उभा राहू शकत नाही त्यामुळे मी सुद्धा हे गाणं उभं राहून गाणार नाही. यातील नायकाने तर भरपूर दारू पिली आहे. तो कसा उभं राहून गाईल? त्यामुळे मी चक्क हे गाणे चक्क खाली झोपून गाईल!” त्याने लगेच प्रकाश मेहरा यांना सांगितले,”कृपया माझ्यासाठी एक टेबल ची व्यवस्था करा.” एक मोठा टेबल रेकॉर्डिंग रूम मध्ये आणला गेला आणि त्या टेबलवर Kishore Kumar अक्षरशः झोपले आणि झोपून त्यांनी हे गाणं गायलं.
=============
हे देखील वाचा : बिमलदांचा क्लासिक म्युझिकल हिट : मधुमती
=============
गाणं होतं ‘इंतहा हो गई इंतजार की. आई ना कुछ खबर मेरे यार की. ये हमे है पता. बेवफा वो नही. फिर वजह क्या हुई इंतजार की?’ यातील प्रत्येक वाक्यानंतरचे उसासे हे जे एडिशन आहेत हे Kishore Kumar (Kishore Kumar) यांनीच घेतले होते. ‘शराबी’ चे पूर्ण कॅरेक्टर या गाण्यांमध्ये त्यांनी उतरवलं होतं. गाणं अतिशय अप्रतिम बनलं होतं. या गाण्याला फिल्मफेअरचे नॉमिनेशन देखील मिळाले. पण अवॉर्ड मात्र या गाण्याला मिळाले नाही. अवॉर्ड Kishore Kumar यांनाच मिळाले पण शराबी मधील दुसऱ्या गाण्यासाठी ते गाणं होतं ‘मंजिले अपनी जगह है रास्ते अपनी जगह…जब कदम हि साथ न दे तो मुसाफिर क्या करे….’ (Untold Stories)