Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Kishore Kumar : किशोर यांनी गाणं गावं म्हणून ‘अश्विनी ये ना’ गाण्यात केला होता ‘हा’ बदल!
भारताला चित्रपटासोबतच संगीताचाही वारसा लाभला आहे. अनेक दिग्गज गायक आजवर होऊन गेले. यातील अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे किशोर कुमार Kishore Kumar). केवळ हिंदीच नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपट आणि संगीतसृष्टीत त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. मुळचे बंगाली असणाऱ्या किशोर दा यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यापैकी मराठीत दोनच गाणी गायली पण दोन्ही गाणी सुपरहिट ठरली. त्यातलं एक गाणं म्हणजे अश्विनी ये ना… पण तुम्हाला माहित आहे का किशोर कुमार यांनी या संपूर्ण गाण्यात एक ठराविक मुळाक्षर म्हटलं नाही आहे. काय आहे हा रंजक किस्सा वाचा…. (Sachin pilgoankar movie)
तर, १९८७ साली आलेल्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका होती. विशेष म्हणजे याच चित्रपटातून वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं होतं. जितका हा चित्रपट गाजला तितकंच किंबहुना त्याहून जास्त चित्रपटातील अश्विनी ये ना हे गाणं सुपरहिट ठरलं. आणि हे गाणं गायलं होतं किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी. मात्र, हे गाणं गाण्याआधी किशोर दा यांनी सचिन यांच्याकडे एक अट घातली होती. (Marathi films stories)

अश्विनी ये ना हे गाणं किशोर कुमार यांनी गावं अशी सचिन यांची इच्छा होती.. त्यांना जेव्हा गाण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी, “नाही मी हे गाणं गाऊ शकत नाही” असं सांगितलं होतं. नकार देण्याचं कारण सांगत किशोर दा सचिन यांना म्हणाले होते की, “सचिन जी तुमच्या मराठीत ‘स’ आणि ‘च’ यामध्ये एक अक्षर आहे जे मला उच्चारता येत नाही.” नीट विचार केला तर यात वर उल्लेख केलेलं मुळाक्षरच नाही आहे. पण त्यांनी सांगितलं की, “मराठीत जसं तुम्ही चमचा म्हणतात तर हिंदीत चमचाचा उच्चार वेगळा होतो.”

त्यानंतर किशोर दा म्हणाले होते की, “मला ते ‘द’ आणि ‘ड’ मधलं अक्षरही उच्चारता येत नाही. ते अक्षर आहे ‘ळ’. ते म्हणाले, “‘ळ’ हे अक्षर मला उच्चारता येत नाही.” त्यावर सचिन किशोर यांना म्हणाले होते की, “‘अश्विनी ये ना’ गाण्यामध्ये जर ‘ळ’ हे अक्षरच नसेल तर तुम्ही गाणार का?” त्यावर किशोर जी म्हणाले, “का नाही? नक्की गाईन.” आणि मग ‘अश्विनी ये ना’ हे गाणं किशोर दा यांनी गायलं. आणि जर का आपण हे गाणं हजार वेळा ऐकलं आहे. त्यात ‘ळ’ हे अक्षर कुठेच नाही आहे हे लक्षात येईल. (Kishore kumar songs)
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?
============
‘गंमत जंमत’ (Gammat Jammat) हा चित्रपट ‘अश्विनी ये ना’ या गाण्यामुळे प्रचलित झालंच पण त्यासोबत या गाण्यात अशोक सराफ यांनी केलेलं नृत्य त्यांच्या चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिलं. चारुशिला साबळे आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यावर चित्रित झालेलं अश्विनी ये ना हे गाणं किशोर कुमार (Kishore kumar) आणि अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी गायलं आहे. (Marathi old movies)
रसिका शिंदे-पॉल