Gurmeet Choudhary फिटनेससाठी अभिनेता गुरमीत चौधरीने केला दीड वर्षापासून भात,
Kishore Kumar शत्रुघ्न सिन्हावर चित्रित किशोर कुमारने गायलेलं पहिले गाणे कोणते?
१९६९ साली राजेश खन्नाचा ‘आराधना’ (Aradhana) हा सिनेमा सुपरहिट झाला आणि त्याच्या सोबतच किशोर कुमारचे यांचे देखील भाग्य उदयास आले. जे संगीतकार किशोर कुमारला पन्नास आणि साठच्या दशकात टाळत होते ते किशोर कुमारचा आवाज आपल्या चित्रपटात असावा म्हणून त्याच्या मागे लागले होते. किशोर कुमार (Kishore Kumar) त्या काळातील एक हुकुमी यशाचं नाणं झालं होतं. प्रत्येक जण त्याचा स्वर आपल्या चित्रपटात असावा यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे किशोर कुमारने प्रत्येक नायकासाठी गायलेलं पहिलं गाणं हे कायमच महत्वपूर्ण राहिलं होतं. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा याच्यासाठी किशोर कुमारने पहिल्यांदा कोणतं गायलं आणि हे गाणं त्याला कसं मिळालं ?
हा मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. मुळात हे गाणं त्याच्यावर चित्रित होणारच नव्हतं. पण नंतर अनपेक्षितपणे चक्र फिरली आणि हे गाणं त्यांच्यावर चित्रित झालं आणि ते किशोर कुमार (Kishore Kumar) चे शत्रुघ्न सिन्हावर पिक्चराईज झालेलं पहिलं सुपरहिट गाणं ठरलं. खरं तर शत्रुघ्न सिन्हा यांची त्या काळातली इमेज ही खलनायकाची होती. सुरुवातीचे तीन-चार वर्ष ते सतत चित्रपटांमध्ये खलनायक सादर करत होते. प्यार हि प्यार, खिलौना, होळी आई रे, प्रेम पुजारी, गॅम्बलर, बनफूल… या सिनेमातील त्याच्या खलनायकी भूमिकांनी चांगले रंग भरले होते. पण शत्रुघ्न सिन्हा यांना खरं तर चित्रपटात नायकाची भूमिका साकारायची होती. पण त्यांचा एकूण चेहरेपट्टी, बोलण्याचा अंदाज आणि एकूणच त्यांची बॉडी लँग्वेज यामुळे त्यांना व्हिलनचे रोल ऑफर होत होते.
पण सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीपासून हे चित्र काहीसं बदलू लागलं. दिग्दर्शक Gulzar यांनी त्यांच्या ‘मेरे अपने’ या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाच्या अभिनयाची बाजू ठळकपणे प्रेक्षकांच्यासमोर आणली. खरंतर हा एक मारधाड पट होता. मुंबईतलं गँगवॉर होतं. पण यातही गुलजार यांच्या परिस्पर्शाने चित्रपट अप्रतिम बनला. यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे नायकाच्या भूमिका येऊ लागल्या. पण तरीही त्यांच्याकरीता किशोर कुमार (Kishore Kumar) यांचे गाणे मात्र मिळत नव्हतं. पण एकदा अनपेक्षितपणे त्यांना एक गाणे मिळाले. हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला पण गाणं मात्र सुपर हिट झालं. शत्रुघ्न सिन्हाची रोमांटिक इमेज इथे प्रेक्षकांना दिसली. कोणतं होतं ते गाणं? आणि काय होता नेमका किस्सा?
हा चित्रपट होता ’बुनियाद’. १९७२ साली रिलीज झाला होता. खरंतर हा चित्रपट आता कुणाला आठवणे शक्य नाही. बी सुभाष दिग्दर्शित या सिनेमात Shatrughan Sinha, फरीदा जलाल, राकेश रोशन आणि योगिता बाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील इतर सर्व गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले होते. फक्त एक युगलगीत राहिले होते. हे युगलगीत किशोर कुमार (Kishore Kumar) आणि लता मंगेशकर गाणार होते. चित्रपटाची सर्व गाणी Anand bakshi यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते.
हे गाणे चित्रपटात कुणावर चित्रित करावं यावर निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यात एकमत होत नव्हतं. खरंतर राकेश रोशन यांचा चेहरा हा शत्रुघ्नपेक्षा अधिक रोमँटिक आणि नायकाला सूटेबल असा होता. त्यामुळे हे गाणं आपल्यावर एक चित्रित होईल असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं पण नंतर अशी काही चक्र फिरली की ते गाणं रेकॉर्डिंग झाल्यानंतर चक्क शत्रुघ्न सिन्हा आणि फरीदा जलाल या जोडीवर ते चित्रित झालं! हे गाणं लिहिलं होतं आनंद बक्षी यांनी तर त्याला मधुर संगीत दिलं होतं Laxmikant–Pyarelal यांनी दिले होते. या युगलगीताचे बोल होते ‘पुकारो मुझे तुम पुकारो मेरे दिल के आईने में जुल्फे आज सावरो’ शत्रुघ्न सिन्हाने देखील आपल्या तत्कालीन इमेजला छेद देत मोठ्या स्टायलिश पद्धतीने हे अप्रतिम युगलगीत पडद्यावर सादर केलं.
Rakesh Roshan ला जेव्हा कळालं की हे गाणं आपल्यावर चित्रीत नाही तेव्हा त्याला थोड वाईट वाटलं पण त्याने खुल्या मनाने मान्य केलं. याच काळात राकेश रोशन यांचा ‘पराया धन’ हा हेमामालिनी सोबतचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात ‘आज उनसे पहिली मुलाखत होगी फिर आमने-सामने बात होगी’ हे गाणं जे किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी गायलं होतं त्यांच्यावर चित्रित झालं होतं. पण या वेळेला एक गोष्ट राकेश रोशनला पुन्हा आठवली ती म्हणजे त्याच्या पहिल्याच चित्रपटात किशोर कुमारने गायलेले गाणं होतं पण ते त्याच्यावर चित्रित न करता सहनायक जलाल आगा यांच्यावर ते चित्रित झालं होतं.
===========
हे देखील वाचा : Sai Paranjpye : यांना ‘चष्मे बद्दूर’ हे टायटल कसे मिळाले?
===========
चित्रपट होता ‘घर घर की कहानी’ आणि गाण्याचे बोल होते ‘समा है सुहाना सुहाना नशे मे जहा है किसी को किसी की खबर ही कहा है…’ ‘बुनियाद’ चित्रपट फ्लॉप झाला पण यातील हे गाणं हिट झालं आता हे गाणं हीच एकमेव या चित्रपटाची आठवण झाली आहे. पुढे राकेश रोशन यांनी अभिनयाची इनिंग फारशी खेळली नाही नंतर ऐंशीच्या दशकात ते निर्माता दिग्दर्शक बनले. शत्रुघ्न सिन्हा मात्र सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील शॉट गन स्टार बनले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी त्यांनी चांगली टक्कर दिली राकेश रोशन यांनी शत्रुघ्न सिन्हाला घेऊन एक चित्रपट बनवला ‘खुदगर्ज’ तो सुपरहिट ठरला.