Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

Kishori Shahane यांनी एका कारणासाठी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटासाठी दिलेला होकार!
अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांचा २००४ मध्ये आलेला ‘नवरा माझा नवसाचा’ (Navara Maza Navasacha Movie) हा चित्रपट तुफान गाजला. तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल ‘नवरा माझा नवसाचा २’ देखील आला. पण प्रेक्षकांमध्ये जितकी क्रेज पहिल्या भागाने आणली त्याला काही तोडच नाही. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय जितका गाजला तितकीच किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी सादर केलेली ठसकेबाज लावणीही तुफान गाजली. मात्र, या चित्रपटात ही लावणी सादर करण्याआधीचा एक खास किस्सा किशोरी शहाणे यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शेअर केला आहे. (Marathi movies 2025)

अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या लावणीमागची विशेष गोष्ट सांगितली. किशोरी म्हणाल्या की, “नवरा माझा नवसाचा या चित्रपटासाठी मला सचिनचा फोन आला आणि ते मला म्हणाले की, मोठा रोल नाहीये एक छोटासा रोल आहे. तुझी आणि अशोकची एक मिनी लव्हस्टोरी आम्ही दाखवणार आहोत. आणि त्यात लावणीही आहे. त्यावर मी फक्त तुमच्या पिक्चरसाठी काहीही इतकंच म्हटलं”(Bollywood News)
पुढे किशोरी म्हणाल्या की, “नवरा माझा नवसाचा जेव्हा मला ऑफर झाला त्यावेळी जवळपास १० वर्ष मी चित्रपटात काम करत नव्हते. लग्न झाल्यावर माझं पहिलं प्राधान्य संसाराला होतं. बॉबी त्यावेळी मोठा होत होता. तेव्हा मालिकेत केवळ मुंबईबाहेर जायचं नव्हतं म्हणून काम करत होते. मुलगा १० वी होईपर्यंत मला मुंबईतच राहायचंय, बाहेर जायचं नाही, असा माझा मी विचार केला होता . तेव्हा सचिनजी म्हणाले की, शूटिंग मुंबईत आहे आणि ते ऐकून मी नवरा माझा नवसाचा चित्रपटासाठी लगेच मी होकार दिला.” (Entertainment News)

‘चला जेजुरीला जाऊ’ या लावणीबद्दल बोलताना किशोरी म्हणाल्या,”ही लावणी चित्रित झाली तेव्हा वाटलं नव्हतं की, एवढी गाजेल. ही लावणी का गाजली माहितीये? कारण ती धार्मिक नव्हती. लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत या गाण्यावर कोणीही नृत्य केलं तरी काही वावगं वाटत नाही”. आजही शाळा-कॉलेजच्या अॅन्युअल डे किंवा डीजेवर ही लावणी हमखास लावून लोकं नाचताना दिसतात.(Bollywood Tadaka)
================================
हे देखील वाचा: Vijay Mallya याने ‘या’अभिनेत्रीचं केलेलं कन्यादान!
=================================
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित आणि अभिनित ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात त्यांच्यासोबत सुप्रिया पिळगांवकर, जयवंत वाडकर, सुनील तावडे, अशोक सराफ, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, कुलदीप पवार, रिमा लागू, जॉनी लिव्हर असे बरेच कलाकार होते. तर, २० वर्षांनी चित्रपटाच्या सीक्वेल ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navara Maza Navasacha 2) मध्ये सचिन आणि सुप्रिया यांच्यासोबत स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे झळकले होते.(Navara Maza Manasacha movie cast)