bobby : आर केच्या ‘बॉबी’ सिनेमाच्या पंजाबमधील डिस्ट्रीब्यूशनचा किस्सा!

Chhaava : अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ची कोटींची दहाड
सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा‘ (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित ‘छावा’ हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सिनेमाने प्रदर्शनाआधीच चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. (Chhaava)
अगदी छावाच्या ट्रेलरपासून ते प्रमोशनपर्यंत प्रत्येक गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यावर आधारित असलेला छावा सिनेमा हा केवळ एक सिनेमा नाही तर एक भावना आहे. या सिनेमाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला छत्रपती संभाजी महाराजांचे आभाळालाही झुकवेल एवढे मोठे कर्तृत्व मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. काही तासातच प्रदर्शित होत असलेल्या छावा सिनेमाने प्रदर्शनाआधीक अनेक रेकॉर्ड तयार केले तर जुने रेकॉर्ड मोडले आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये (Advance Booking) देखील ‘छावा’ने मोठी भरारी घेतली आहे. प्रदर्शनाआधीच छावा सिनेमाची अनेक कोटींची अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. (Chhaava Advance Booking)

या पीरियड ड्रामा सिनेमाची प्री-तिकीट विक्री ८ फेब्रुवारीपासून अर्थात सहा दिवस आधीच सुरू झाली. आतापर्यंत छावा सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केवळ करोडोंची कमाई केली नाही तर त्याच्या तिकिट विक्रीने नवीन विक्रमही रचले आहेत! व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या भव्य ऐतिहासिक सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगवरूनच ‘छावा’ची प्रेक्षकांमध्ये असलेली कमालीची क्रेझ दिसून येत आहे. (Bollywood Tadka)
छावा सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे थक्क करणारे आहे. सिनेमाने प्रदर्शनाआधीच करोडोंची तिकिटं विकली आहे. ‘सॅकनिल्क’च्या (sacnilk) रिपोर्टनुसार आतापर्यंत या सिनेमाची तब्बल १० कोटींची ५ लाख (5 lac) तिकिटं विकली गेली आहेत. हिंदी भाषेतील 2डी व्हर्जनमधील तब्बल ८.४८ कोटी रुपयांच्या तिकिटांची विक्री अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. तर हिंदी IMX 2डी व्हर्जनमध्ये ‘छावा’चे २९.४८ लाख रुपयांची तिकिटं बुक झाली आहेत. (Box Office Collection)

हिंदी फोरडीएक्स व्हर्जनमध्ये आणि हिंदी ICE मिळून १० लाख तिकिटं प्री-सेलमध्ये विकली गेली आहे. दरम्यान संपूर्ण भारतामध्ये छावा सिनेमाला एकूण ५५६५ शो मिळाले आहेत, त्यापैकी हिंदी २डी ला ५४४४, हिंदी आयमॅक्स २डी ला ६१, हिंदी ४डीएक्स ला ५१ आणि हिंदी आयसीई ला ९ शो मिळाले आहेत. छावा सिनेमाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ट्रेलरनंतर ही उत्सुकता शिगेला पोहचली. अशातच सिनेमा प्रदर्शित होतोय त्याच दिवशी तो पाहण्यासाठी प्रेक्षकांची अॅडव्हान्स बुकिंगसाठी एकच चढाओढ दिसत आहे. (Bollywood Masala)
=======
हे देखील वाचा : Andaz Apna Apna Re-Release Date: तब्बल 31 वर्षांनंतर सलमान आणि आमीरची जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार !
=======
सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, छावा सिनेमामध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) हा छत्रपती संभाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये विकीचा अभिनय अतिशय प्रभावी असल्याने त्याच्या अभिनयाच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. पुन्हा एकदा विकी त्याच्या जिवंत अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळणार यात शंका नाही. यासोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Madana) महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या (Akshaye Khanna) भूमिकेत झळकेल. मुख्य म्हणजे या सिनेमात अनेक मराठी दिग्गज कलाकार दिसणार आहे. (Top Stories)