ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जाणून घ्या आपल्या प्रतिभेने सगळ्यांचा लाडका असलेल्या नीलोत्पल बोराबद्दल
ग्लॅमर जगात, सिनेसृष्टीत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. फक्त अभिनयच नाही तर या क्षेत्रात पडद्यावर, पडद्यामागे काम करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी अनेक जणं प्रयत्न करतात आणि मुंबईत येतात. त्यातही आज जर आपण पाहिले तर, संगीत आणि अभिनय या दोन माध्यमांमध्ये लोकांचा जास्त कल असल्याचे आपल्याला दिसते.
आज विविध रियॅलिटी शो मुळे अनेक प्रतिभावंत कलाकार त्यांची कला जगासमोर आणू शकतात. मात्र असे देखील अनेक कलाकार आहेत, ज्यांनी स्वतःच मेहनत करून काम करून त्यातून आपली ओळख मिळवली. असाच एक कलाकार म्हणजे नीलोत्पल बोरा. संगीतकार, गायक, वादक अशा विविध कलांमध्ये पारंगत असणारा नीलोत्पल कोणाला माहित नाही असे कोणीच नसेल.
सध्या सर्वच गाजणाऱ्या लोकप्रिय होणाऱ्या वेबसिरीजमध्ये नीलोत्पलचेच संगीत आणि गाणी असतात. त्याने आतापर्यंत ‘TVF’s Aspirants’, ‘Tripling Season 2’, ‘Yeh Mari Family’ आणि ‘Saas Bahu Achar Pvt Ltd’ आदी अनेक लोकप्रिय वेबसिरीजला संगीत दिले आहे.. त्याच्या ‘जादूगार’ या सिरीजमधील ‘शाबास’ हे एक गाणे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील भारतीय खेळाडूंसाठी त्यांचे अँथम म्हणून निवडले गेले होते.
मूळचा आसामचा असलेला नीलोत्पल बोरा हा संगीत क्षेत्रात करियर करण्याच्या उद्देशाने मुंबईमध्ये आला आणि त्याने इथे भरीव कामगिरी करत चांगलाच नाव लौकिक कमावला. नीलोत्पलचे सर्व बालपण आसाममधील जोरहाट या शहरात गेले. त्याला संगीताचा वारसा त्याच्या घरातूनच मिळाला. त्याचे आजोबा आसामधील प्रसिद्ध संगीतकार होते . तर आई आणि काकू यांनी हिंदुस्थानी क्लासिकल संगीताचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले होते.
नीलोत्पलचे आई-वडील हे पेशाने शिक्षक होते. त्याने सहावीत असताना तबला शिकायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक वर्ष तबल्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे त्यांनी संगीत रचना आणि संगीत निर्मितीचे देखील प्रशिक्षण घेतले. शाळेत असताना नीलोत्पल हा खूपच खोडकर मुलगा होता. त्याला सतत वर्गात शिक्षा केली जायची. त्याला वर्गाच्या बाहेर किंवा वर्गात कोपऱ्यात उभे केले जायचे.
आज संगीत क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या नीलोत्पलला लहान असताना संगीत, गाणे अजिबातच आवडत नव्हते. त्याला संगीत म्हणजे गोंगाट वाटायचा. त्याला फिरण्याची प्रचंड आवड आहे. लहान असताना त्याला सायकल चालवण्याची, मासे पकडण्याची खूपच आवड होती. संगीत सगळेच करू शकतात असे मला वाटायचे. कारण त्याच्या घरात सर्वच संगीत शिकलेले. त्यामुळे त्याची सकाळ नेहमीच रियाजाने व्हायचे. म्हणून त्याला संगीतामध्ये आवड नव्हती. सतत आजूबाजूला संगीत असल्याने त्याला त्याचा कंटाळा यायला लागला होता.
नीलोत्पलला गाणे ऐकायला आवडायचे. पुढे जाऊन त्याला त्याच्या मावशीने गाणे शिकवायला सुरुवात केली. विविध स्पर्धांमध्ये त्याला ते घेऊन जायचे. तो जिथे जायचे तिथे त्याला बक्षीस मिळायचे, नाव व्हायचे, पेपरमध्ये नाव यायचे हे सर्व त्याला आवडू लागले आणि त्याला संगीतात, गाण्यात रस येऊ लागला. आठवीत असताना त्याने गाण्यांना संगीत द्यायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने त्याच्या बँडसाठी एक गाणे तयार केले होते. इथूनच त्याची संगीतकार म्हणून सुरुवात झाली.
आसाममध्ये नीलोत्पलला खूपच कौतुक आणि लोकप्रियता मिळू लागली. त्याचे सर्वात पाहिले गाणे २०१७ साली ‘माजुली’ने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. याआधी त्याने अनेक गाण्यांना संगीत दिले, त्याचे विविध अल्बम आले. आसामी भाषेत त्याने २००६ साली पहिल्यांदा प्रोफेशनल संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक आसामी मालिकांना देखील संगीत दिले. २०१२ साली त्याने गुवाहाटीमधील रेडिओ गपशप मध्ये प्रोमो प्रोड्युसर म्हणून एक वर्ष काम केले.
२०१२ साली नीलोत्पल ‘सेवन अनप्लग’ या अल्बमच्या कामासाठी मुंबईमध्ये आला होता. या शहरात आल्यावर त्याला खूपच मजा आली. इथले वातावरण आणि एनर्जी त्याला फारच आवडली. तो त्याचे काम झाल्यावर गुवाहाटीला परत गेला. मात्र मुंबई त्याला खेत होते. २०१३ साली एक दिवस अचानक त्याने त्याचे सगळे काम आटोपून मुंबईला येण्याचे ठरवले आणि तो मुंबईला आला. इथे त्याने बराच संघर्ष केला आणि त्याच्या या संघर्षाला यश आले.
========
हे देखील वाचा : मुकेशने गायलेले गाणे पुन्हा रफीच्या आवाजात रेकॉर्ड केले!
========
नीलोत्पलसाठी लता मंगेशकर, भूपेंद्र हजारिका, पेपोन, किशोर कुमार आदी दिग्गज कलाकार प्रेरणा आहेत. ‘ये मेरी फॅमिली’ मधील ”धागा” या गाण्याने त्याला रातोरात ओळख मिळवून दिली. यानंतर त्याने कधीच मागे वाळवून पाहिले नाही. पुढे त्याने अनेक वेबसिरिजला संगीत दिले आणि आज युवा पिढीचा अतिशय लाडका गायक आणि संगीतकार म्हणून त्याला ओळखले जाते.