Kishore Kumar शत्रुघ्न सिन्हावर चित्रित किशोर कुमारने गायलेलं पहिले गाणे
OTT Release २०२५ च्या पहिल्याच आठवड्यात ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका
नुकताच आपण २०२४ चा निरोप घेतला आणि २०२५ चे सर्वांनीच मोठ्या जल्लोषात स्वागत केले. २०२५ सुरु झाल्यानंतर देखील लोकांसाठी अजिबातच मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. २०२५ या नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन होणार आहे. या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात काही अतिशय उत्कंठावर्धक सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. त्या कोणत्या ते आपण जाणून घेऊया. (OTT Release)
डोंट डाय (Don’t Die)
ख्रिस स्मिथची ‘डोंट डाय’ ही डॉक्युमेंटरी (Don’t Die) या नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये लोकांना ब्रायन जॉन्सनच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ही डॉक्युमेंटरी १ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाली आहे. (Entertainment mix masala)
मिसिंग यू (Missing You on)
‘मिसिंग यू’ (Missing You on) ही एक हॉलिवूड सस्पेन्स टीव्ही मालिका असून, ही देखील वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाली आहे. (Webseries)
एविसी- आई अॅम टिम (Avicii – I’m Tim on)
एविसी- आई अॅम टिम (Avicii – I’m Tim on) ही डॉक्युमेंटरी ३१ डिसेंबर २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाली आहे. या सिरीजच्या निमित्ताने लोकांना स्वीडिश DJ Avicii च्या आयुष्याबद्दल माहिती मिळणार आहे. (Webseries News)
ऑल वी इमॅजिन ॲज लाइट (All We Imagine As Light)
कान २०२४ चित्रपट सोहळ्यात ‘ग्रां पी’ पुरस्कार विजेती सिरीज असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ (All We Imagine As Light) प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट ३ जानेवारीला डिस्ने+ हॉटस्टारवर (Dinsey + Hotstar) प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा मुंबईतील दोन मल्याळी नर्सच्या आयुष्यावर बेतलेला आहे.
गुनाह २ (Gunaah Season 2)
गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani), सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)आणि झैन इबाद खान यांची ‘गुनाह’ही वेब सीरिज हिट झाल्यानंतर आता या याचा दुसरा सीझन गुनाह 2 (Gunaah Season 2) प्रदर्शित होत आहे. ३ जानेवारीपासून हॉटस्टारवर ‘गुनाह 2’ डिस्ने+हॉटस्टारवर (Dinsey + Hotstar) पाहता येईल.