Madhugandha Kulkarni मधुगंधा कुलकर्णीने केले, हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’चे भरभरून
Karanveer Mehra बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहराबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
बिग बॉस १८ (Bigg Boss 18) चा ग्रँड फिनाले नुकताच संपन्न झाला. मागील १०५ दिवसांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. सलमान खान सूत्रसंचालक असलेला बिग बॉस हा शो एक वादग्रस्त शो म्हणूनच ओळखला जातो. मात्र असे असूनही या शो ची लोकप्रियता कमालीची आहे. टेलिव्हिजन अभिनेता असलेल्या करणवीर मेहराने (Karanveer Mehra) बिग बॉस १८ ची ट्रॉफी जिंकत आपले स्वप्न साकार केले आहे. (Karanveer Mehra)
करणवीरने अभिनेता विवियन डिसेनाचा पराभूत करत शो चे जेतेपद पटकावले. त्याने याआधी रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १४’ चे देखील अंतिम विजेतेपद पटकावले होते. करणवीरचा प्रामाणिक गेम बिग बॉसच्या सर्वच प्रेक्षकांना आवडला आणि त्यांनी त्याला विजेता ठरवले. सुरुवातीपासूनच करणवीरने आपला खेळ दाखवत लोकप्रियता मिळवली आणि त्याचे फळ त्याला हा शो जिंकून मिळाले. (Bigg Boss 18 Winner)
२००५ पासून करणवीर मनोरंजनविश्वामधे सक्रिय आहे. मात्र त्याला अपेक्षित लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र ‘खतरों के खिलाडी १४’ हा शो जिंकल्यानंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि तो बिग बॉसमध्ये आला. सुरुवातीला करणवीर थिएटर करायचा. लहानपणापासूनच त्याला अभिनय क्षेत्रात रस होता. त्याने २००५ साली ‘रिमिक्स’ मधून आपल्या करियरची सुरुवात केली. (Karanveer Mehra Journey)
त्यानंतर करणवीरने टेलिव्हिजन जगातील ‘पवित्र रिश्ता’, ‘बातें कुछ अनकही सी’, ‘बहनें’, ‘परी हू मै’, ‘अमृत मंथन’, ‘विरुद्ध’ आदी अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. यासोबतच तो ‘रागिनी एमएमएस २’, ‘लव्ह स्टोरी २०५०’, ‘बदमाशियां’, ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसला. ओटीटीवर त्याने ‘पॉयझन २’, ‘इट्स नॉट सिंपल’ या वेबसीरिजमध्ये देखील काम केले होते. मात्र त्याच्या आयुष्यात २०२४ आणि २०२५ हे दोन वर्ष महत्वाचे ठरले या दोन वर्षात त्याने ‘खतरों के खिलाडी १४’ आणि ‘बिग बॉस १८’ या शोमधून अफाट लोकप्रियता मिळवली. (Entertainment Mix Masala)
करणवीर आज जरी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये गाजत असला तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र विवादित राहिले. करणचे दोन लग्न झाले असून, दुर्दैवाने दोन्ही लग्न टिकले नाही.त्याने पहिले लग्न २००९ मध्ये देविकासोबत केले होते. मात्र ९ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. देविका ही करणची चांगली मैत्रीण होती. दोघांनी काही काल एकमेकांना डेट केले आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे करणवीरने २०२१ मध्ये अभिनेत्री निधी सेठशी दुसरे लग्न केले. हे लग्न तर केवळ दोनच वर्ष टिकले आणि २०२३ मध्ये करण आणि निधी यांनी घटस्फोट घेतला. (Karanveer Mehra Personal Life)
=================================
हे देखील वाचा : Bigg Boss 18 बिग बॉस 18 च्या ट्रॉफीवर करणवीर मेहराने कोरले नाव
=================================
२०१६ हे वर्ष करणवीरसाठी खूपच वाईट ठरले. करण यावर्षी त्याचा मोठा आणि गंभीर अपघात झाला. करणवीर मेहराच्या दुचाकीला गंभीर अपघात झाला होता. यानंतर जवळपास पाच महिने तो अंथरुणातच होता. याच काळात त्याला दारुचे व्यसन लागले. मात्र पुढे त्याने स्वत:वर नियंत्रण ठेऊन मोठ्या जिद्दीने हे व्यसन सोडवले. एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार करणवीर मेहराकडे १२ कोटींची संपत्ती आहे. यासोबतच त्याचेकडे दिल्लीमध्ये एक मोठे घर देखील आहे. बिग बॉस १८ जिंकल्यानंतर त्याला ५० लाखांचे बक्षीस देखील मिळाले आहे.