आमीर खानने ‘सरफरोश‘ सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्यात का बदल केले?
![जाणून घ्या यावेळी Bigg Boss OTT 3 मध्ये कोणते सेलेब्स येऊ शकतात?](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/th-1-1-850x560.jpg)
जाणून घ्या यावेळी Bigg Boss OTT 3 मध्ये कोणते सेलेब्स येऊ शकतात?
‘बिग बॉस ओटीटी ३’ २१ जूनपासून सुरू होत आहे. या अधिकृत घोषणेमुळे सलमान खानऐवजी बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर हा रिअॅलिटी शो होस्ट करणार असल्याचेही 100 टक्के निश्चित झाले आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३‘मध्ये अनिल कपूरबद्दल चाहते प्रचंड उत्सुक असताना चॅनलमध्ये येणाऱ्या स्पर्धकांची नावे जाणून घेण्यासाठी ही ते खूप उत्सुक आहेत. तर आज आम्ही तुम्हाला च्या स्टार्सची नावे सांगतो ज्यांना शोमध्ये येण्यासाठी चॅनलकडून संपर्क करण्यात आला आहे आणि ते देखील या शोचा भाग बनू शकतात. पण अद्याप कोणच्याही स्पर्धकांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत.(Bigg Boss OTT 3 Contestant List)
![Bigg Boss OTT 3 Contestant List](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/th-2-1.jpg)
टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, यावेळीही अनेक यूट्यूबर्स शोमध्ये दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रियाज अली, जैन सफी यांच्याव्यतिरिक्त अनेक स्टार्सची नावेही चर्चेत आहेत. या शोमध्ये शिवांगी जोशी, शफाक नाझ, दलजीत कौर, विरल वडापाव गर्ल चंद्रिका, नुपूर सेनन, भव्या गांधी, तनुश्री दत्ता, विकी जैन आणि अदनान शेफ यांची ही नावे समोर आलेली आहेत मात्र, यापैकी एका ही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
![Bigg Boss OTT 3 Contestant List](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/th-1-1.jpg)
काही दिवसांपासून करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरही शोमध्ये येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण व्हीजेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. ‘जर मी गुगलवर माझं नाव सर्च करत असेल तर मला ते 23 तासांपूर्वी सापडलं आहे. काय खोटं आहे. मी कुणाशी बोललो नाही किंवा मला कोणाचा फोनही आला नाही. निर्मात्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलावले नाही कारण त्यांना माझे उत्तर माहित आहे'(Bigg Boss OTT 3 Contestant List)
============================
============================
यावेळी बिग बॉस ओटीटी ३‘ अभिनेता अनिल कपूर होस्ट कराणार आहे आणि नुकतीच त्यांची पतेरकार परिषद पार पडली यावेळी अनिल कपूर म्हणाले की- ‘असे वाटते की मी वयाने रिवर्स करत आहे. बिग बॉस खरोखरच टाइमलेस आहे. असं वाटतंय की मी पुन्हा शाळेत जातोय आणि काहीतरी नवीन रोमांचक करण्याचा प्रयत्न करतोय.”