Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप ‘वाघ आला’ प्रदर्शित; सोशल मीडियावर होतेय चर्चा! 

 Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप ‘वाघ आला’ प्रदर्शित; सोशल मीडियावर होतेय चर्चा! 
Wagh Aala Marathi Rap Kolhapur
मिक्स मसाला

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप ‘वाघ आला’ प्रदर्शित; सोशल मीडियावर होतेय चर्चा! 

by Team KalakrutiMedia 24/02/2026

मराठी संगीतविश्वात गेल्या काही वर्षांत रॅप आणि हिप-हॉपचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसतो आहे. पारंपरिक संगीतासोबतच तरुणाईच्या भावना व्यक्त करणाऱ्या नव्या शैलींनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या बदलत्या प्रवाहात कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण रॅपर ए किंग ( Rapper A King) याने आपल्या नव्या रॅप सिंगल “वाघ आला”द्वारे दमदार एंट्री केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, स्थानिक कलाकारांचा सहभाग आणि ऊर्जादायी सादरीकरणामुळे हे गाणे विशेष ठरत आहे. “वाघ आला” या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरातील ग्रामीण भागात करण्यात आले आहे. (Wagh Aala Marathi Rap)

Wagh Aala Marathi Rap
Wagh Aala Marathi Rap Kolhapur

शिरोली एमआयडीसी येथील इंदिरानगर परिसरात पार पडलेल्या शूटमध्ये गावाकडची माती, रस्ते आणि नैसर्गिक वातावरण प्रभावीपणे टिपण्यात आले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन ए किंग आणि विकास पवार यांनी केले असून, गीतलेखन स्वतः ए किंगने केले आहे. संगीत संयोजनाची जबाबदारी प्रवीण एवाळे यांनी सांभाळली आहे. 

Wagh Aala Marathi Rap
Wagh Aala Marathi Rap Kolhapur

ए किंग सांगतो की, लहानपणापासून संगीताची आवड असल्याने त्याने या क्षेत्रात पाऊल टाकले. त्याच्या मते रॅप आणि हिप-हॉप हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक संदेश देण्याचे प्रभावी माध्यम आहे. “वाघ आला” हे गाणे तयार करताना त्याला उर्जादायी आणि प्रेरणादायी आशय मांडायचा होता. उच्च पट्टीतील या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान त्याला अनेक वेळा रिटेक घ्यावे लागले, पण अंतिम परिणामाबद्दल तो समाधानी आहे. शूटिंगदरम्यान घडलेली एक खास घटना म्हणजे गावातील एका आजोबांनी अचानक सेटवर येऊन गाण्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली; त्यांच्या सहभागामुळे चित्रीकरणाला वेगळीच रंगत आली. (Wagh Aala Marathi Rap)

===============================

हे देखील वाचा: Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद यांचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न…

===============================

सध्या “वाघ आला” हे गाणे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, मराठी रॅपच्या नव्या लाटेला आणखी बळ देत आहे. स्थानिकतेचा अभिमान, दमदार शब्दरचना आणि जोशपूर्ण सादरीकरण यामुळे ए किंगचे हे गाणे मराठी हिप-हॉपमध्ये वेगळी ओळख निर्माण करत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: A King  Rapper Celebrity Entertainment Independent Artist India Kolhapur Rapper Marathi Hip Hop Marathi Music Industry marathi rap song New Marathi Song Rural Music Video Social Media Viral Song Wagh Aala Marathi Rap
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.