
Kon Hotis Tu, Kay Jhalis Tu Serial : कोण होतीस तू, काय झालीस तू! या नव्या मालिकेतून Girija Prabhu नव्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Kon Hotis Tu, Kay Jhalis Tu Serial: दोन दिवसांपूर्वी स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये अशी घोषणा करण्यात आली आहे की, स्टार प्रवाहवरील आवडती नायिका पुन्हा वाहिनीवर परतणार आहे. ही नायिका नेमकी कोण? आणि मालिकेचं नाव काय असेल? अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून ही मालिका आणि मालिकेतील नायिकासुद्धा समोर आली आहे.(Actress Girija Prabhu)

स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू! या नव्याकोऱ्या मालिकेतून गिरीजा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेतील कावेरी ही भूमिका साकारण्यासाठी गिरीजा प्रचंड उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, ‘स्टार प्रवाह माझी लाडकी वाहिनी आहे. पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार. कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्ट मालवणात घडते त्यामुळे मालवणी भाषा शिकतेय. मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच. मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी मालवणी भाषेचे धडे गिरवत आहे. कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. (Actress Girija Prabhu)
==================================
हे देखील वाचा: Star Pravahकडून महिला दिनाची विशेष भेट; टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगणार अद्भुतपूर्व ‘महासंगम महानायिकांचा’ !
===================================
वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते. बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल. गौरी आणि नित्या या दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे तेच प्रेम कावेरीलाही मिळेल अशी खात्री आहे. तेव्हा लवकरच फक्त स्टार प्रवाहवर नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू! नक्की पाहा.