Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘रात्रीस खेळ चाले’फेम अभिनेत्री प्राजक्ता वाडये ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेत साकारणार ‘बायो’!

 ‘रात्रीस खेळ चाले’फेम अभिनेत्री प्राजक्ता वाडये ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेत साकारणार ‘बायो’!
kalakruti-ratris-khel-chale-fame-actress-prajakta-wadaye-to-play-bayo-in-kshetrapal-shri-dev-vetoba-serial-marathi-info
टीव्ही वाले

‘रात्रीस खेळ चाले’फेम अभिनेत्री प्राजक्ता वाडये ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेत साकारणार ‘बायो’!

by शुभांगी साळवे 15/07/2023

‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असलेली सन टीव्ही नेटवर्कची ‘सन मराठी’ वाहिनी गेली दोन वर्षे वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून, मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही वाहिनी आणि प्रेक्षकवर्ग यांच्यातील नातं आता अतूट आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांना जिव्हाळ्याची वाटते आणि आता यामध्ये श्री देव वेतोबाची कथा मांडणारी “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही आणखी एक नवी मालिका सहभागी होत आहे. १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.श्री देव वेतोबाची गोष्ट अनुभवयाला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक असतीलच, पण नव्या मालिकेच्या माध्यमातून कलाकारांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळण्याचा आनंदही त्यांना होत असतो. अभिनेता उमाकांत पाटील हा या मालिकेचा प्रमुख चेहरा आहे जो ‘वेतोबा’ची भूमिका साकारणार आहे. पण त्यासह, आणखी कोणते कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली असतानाच आणखी एका प्रमुख पात्राची ओळख  वाहिनीने करुन दिली आहे.(Actress Prajakta Wadaye) 

Actress Prajakta Wadaye
Actress Prajakta Wadaye


मालवणी भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणारी, कोकणचा चेडू आणि गुणी अभिनेत्री प्राजक्ता वाडये “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत प्राजक्ता ‘बायो’ या पात्राच्या भूमिकेत दिसेल. प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांत काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिका इतक्या लोकप्रिय झाल्या की प्राजक्ता हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेतील प्राजक्ताचं ‘बायो’ हे मालवणी पात्रं देखील लोकप्रिय ठरेल यात शंका नाही. 

Actress Prajakta Wadaye
Actress Prajakta Wadaye

आता बायो हे पात्रं सकारात्मक आहे की नकारात्मक याचा अंदाज प्रेक्षकांना येईलच, पण हे मात्र नक्की की, प्राजक्ताच्या या भूमिकेमुळे मालिकेचे प्रत्येक भाग रंजक वळणावर पोहोचणार आहेत.‘सोमिल क्रिएशन’ प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सुनील भोसले निर्मित “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेचे दिग्दर्शन नितिन काटकर यांनी आहे.((Actress Prajakta Wadaye) 

========================

हे देखील वाचा: ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’तून राजवीर आणि मयूरी ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

========================

तसेच निलेश मयेकर यांनी या मालिकेची कथा लिहिली आहे तर राजेंद्रकुमार घाग यांनी पटकथा आणि महाबळेश्वर नार्वेकर यांनी संवाद लिहिले आहेत. येत्या १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही मालिका आपल्याला सन मराठी या वाहिनीवर पाहता येईल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actress Prajakta Wadaye kshetrapal shree dev vetoba marathi serial on vetoba ratris khel chale actress sun marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.