Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Kota Factory 3 चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज; ‘जीतू भैय्या’चा क्लास आता पुन्हा सुरू होणार
अखेर आता प्रतीक्षा संपली आहे. नेटफ्लिक्सची प्रसिद्ध वेब सीरिज ‘कोटा फॅक्टरी’च्या सीझन 3 चा ट्रेलर समोर आला आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘कोटा फॅक्टरी ३‘चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सने नुकतीच मजेशीर पद्धतीने सिरिजची रिलीज डेट जाहीर केली होती, आता चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी निर्मात्यांनी मालिकेचा ट्रेलर रिलीज केला आहे. नेटफ्लिक्स इंडियाने कोटा फॅक्टरी सीझन 3 चा अधिकृत ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यात सर्वांचा आवडता जितू भैय्या आपल्या विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेश परीक्षेत चांगल्या गुणांसह यशस्वी होण्यासाठी वर्ग घेताना दिसत आहे. (Kota Factory 3 Trailer)

कोटा फॅक्टरी पहिल्यांदा 2019 मध्ये आली होती आणि त्या दरम्यान ती यूट्यूबवर आली होती, पण ती इतकी लोकप्रिय झाली की नेटफ्लिक्स इंडियाने ती विकत घेतली आणि त्यानंतर त्याचा दुसरा सीझन आला आणि त्याने ही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आणि आता चाहते त्याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता काही दिवसांपूर्वीच ‘कोटा फॅक्टरी 3’च्या प्रदर्शनाची तारीख ही जाहीर करण्यात आली आणि आता ट्रेलरही रिलीज झाला आहे.

व्हिडिओमध्ये जितेंद्र कुमार उर्फ जीतू भैय्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देतात की त्यांचे विद्यार्थी त्यांना जितू सर नव्हे तर जितू भैय्या का म्हणतात? तो म्हणतो, “मॅडम काय आहे की कोटामध्ये मुलांसाठी सर्व काही आहे, पण हे लोक फक्त जेईई एस्पिरेंट्स नाहीत. हे लोक १५-१६ वर्षांचे आहेत हे आपण विसरतो. इनफैचुएशनंस आहे, इनसिक्योरिटीआहे. शिक्षक ओरडले तर ते डिमोटिवेट होतात. एखादा मित्र काही बोलला तर त्यांना त्याचं वाईट वाटतं. हे लोक प्रत्येक गोष्ट सीरियसली घेतात, त्यांची जबाबदारी खूप मोठी असते. जितू सर हे सांभाळू शकत नाहीत.” (Kota Factory 3 Trailer)
==============================
हे देखील वाचा: Sonakshi Sinha लवकरच बॉयफ्रेंड Zaheer Iqbal सोबत ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात
==============================
प्रतिश मेहता दिग्दर्शित आणि टीव्हीएफ प्रॉडक्शननिर्मित ‘कोटा फॅक्टरी ३‘ वेब सीरिज दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले आहे. वेब सीरिजच्या आगामी सीझनमध्ये जितेंद्र कुमार, मयूर मोरे, अहसास चन्ना, आलम खान आणि रंजन राज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेच्या मागील दोन सीझनला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.