Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2 आणि Jhimma 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

 Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2 आणि Jhimma 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला !
Jhimma 3
मिक्स मसाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2 आणि Jhimma 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

by Team KalakrutiMedia 06/02/2026

मराठी माध्यमाच्या शाळेची ओळख, भावना आणि अस्मिता ठळकपणे मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २५ कोटींचा टप्पा पार करत भक्कम यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. या घवघवीत यशाच्या निमित्ताने चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, तांत्रिक टीमसोबतच मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर आणि दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभली. या समारंभात चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत निर्माते आणि दिग्दर्शकांनी प्रेक्षकांचे तसेच संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे, याच सोहळ्यात प्रेक्षकांसाठी दोन मोठ्या आणि उत्सुकता वाढवणाऱ्या घोषणा करण्यात आल्या. सुपरहिट ठरलेल्या ‘झिम्मा’ फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘झिम्मा ३’ (Jhimma 3) तसेच प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेल्या कथेला पुढे नेणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम २’ अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.(Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2)

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2

चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “प्रेक्षकांनी हा चित्रपट मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. २५ कोटींचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमच्या मेहनतीची आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि पडद्यामागे मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार. रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे. याच प्रेमामुळे आम्हाला आणखी प्रामाणिक आणि आशयपूर्ण कथा घेऊन येण्याची प्रेरणा मिळते.” या यशस्वी प्रवासात सचिन खेडेकर (Sachin Khedekar), अमेय वाघ (Amey Wagh) , सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar), क्षिती जोग (Kshiti Jog) , कादंबरी कदम, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या सशक्त अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील भावनिक नातेसंबंध, वास्तवाशी जोडलेला आशय आणि मराठी शाळेच्या आठवणी जागवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही, तर प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव बनला.

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2

२५ कोटींचा ऐतिहासिक टप्पा, सत्कार समारंभातील उत्साह आणि आगामी दोन चित्रपटांच्या घोषणांमुळे ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चा प्रवास आता नव्या उंचीवर पोहोचताना दिसतो आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बळावर ही टीम पुन्हा एकदा दमदार, आशयघन आणि मनाला भिडणारी कथा घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे.(Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2)

==============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार तूफान राडा !

==============================

दरम्यान, या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Hemant Dhome films Jhimma 3 Jhimma franchise Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam 2 Marathi cinema news Marathi film announcements Marathi movies upcoming
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.